राज ठाकरे म्हणतात... ती बातमी चुकीची  - Raj Thackeray says ... that news is wrong | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरे म्हणतात... ती बातमी चुकीची 

वैदेही काणेकर
मंगळवार, 2 मार्च 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. विधान भवनात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, राज यांनी ही कोरोनाची चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आले नाही, अशा स्वरुपाच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्यावर खुद्द राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, विधान भवनात येण्याबाबतची बातमी खोटी आहे. पण, आपण लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

...तो पर्यंत शेतकऱ्यांची वीज कापणार नाही-अजित पवारांची ग्वाही

 

ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. मात्र, मंत्रालयात विनामास्क आणि विना आरटीपीसीआर चाचणी प्रवेश नाही, याची त्यांना माहिती मिळाली. आपण मास्क वापरणार नाही, असे राज ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही, याची कुणकुण लागल्याने ठाकरे माघारी फिरले असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्या बातम्या चुकीच्या असल्याचे राज यांनी साम टिव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगतिले. 

सध्या राज्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असल्याने कोरोनाबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच कडक नियमांची अंमलबजावणी करुन होत आहे. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना चाचणी केलेली नसल्यास विधान भवनात प्रवेश दिला जात नाही. 

काॅंग्नेस त्यांमध्ये जुंपली: निवडणुकीतील आघाडीवरुन ज्येष्ठ नेत्याचे टीकास्त्र
 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे राज्य सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. राज्यात कोरोनाचे नियम कडक केलेले असताना आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात रात्रीच्या वेळी पब सुरु असल्याचे मनसैनिकांनी फेसबुकच्या माध्यमातून दाखवून दिले होते. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख