अर्धा तास राज ठाकरेंनी बैठकीत आढावा घेतला आणि ते आता घरी गेलेत

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, या बैठकीसाठी ठाकरे यांनी अर्धा तासच हजेरी लावत आढावा घेतला.

मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षातील सदस्यांना संबोधत केले. राज्यातील महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले.

पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी टीम तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा या टीममध्ये सहभाग असेल. प्रत्येक शहरानुसार ही टीम तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. शिवाय बुधवारी पुन्हा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक बोलावली आहे.
 
महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीत लढणार असल्याचे चित्र असताना मनसे नेमकी काय भुमीका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा होती. पण, त्याबाबत मात्र आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. त्यावर राज ठाकरे सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतील असं कळत आहे. 

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये सरशी मिळवण्याच्या उद्देशानं पक्षाची पुढील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं म्हटलं गेलं. पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी हाताला प्लॅस्टर करुन डाव्या हाताला दुखापत असतानाही राज ठाकरे यांनी बैठकीच्या ठिकाणी हजेरी लावली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा राज्य शासनाने कमी केली आहे. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यासाठी समर्थ असल्याचं मनसे नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज वांद्र्यात मनसेच्या बैठकीच्या वेळी मनसेचे महाराष्ट्र कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक लिहिलेले टीशर्ट घालून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com