...पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असे नाही!

नाशिक महापालिकेच्या रुग्णालायत झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांना आपली जीव गमवावा लागल्याची घटना, ताजी असतानाच विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
 Raj Thackeray  .jpg
Raj Thackeray .jpg

मुंबई : नाशिक महापालिकेच्या रुग्णालायत झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांना आपली जीव गमवावा लागल्याची घटना, ताजी असतानाच विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यावरुन महाराष्ट्र निवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

या संदर्भात राज ठाकरे यांनी ट्वट केले आहे, त्यामध्ये ते म्हणाले की, ''आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य''. असे ठाकरे म्हणाले आहेत.

...''पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असे नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचे तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवे. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत'' असे राज यांनी सांगितले आहे.   

दरम्यान,  विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. 

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाला. यातील पाच जणांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी ९० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com