अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट - Raj Thackeray Maharashtra tour after Ayodhya tour | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

राज ठाकरे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्या नंतर विश्व हिंदु परिषदेचे मोहन सालेकर यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली

मुंबई : मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्या नंतर विश्व हिंदु परिषदेचे मोहन सालेकर यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमांध्यमाशी बोलताना सालेकर म्हणाले, अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासतर्फे निधी संकलन अभियान सुरू आहे. त्यासाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे माहिती देण्यासाठी आलो होतो. यात त्यांचं सहकार्य मिळावं यासाठी ही भेट असल्याचे सालेकर यांनी सांगितले.  

यावेळी सालेकर म्हणाले, मनातला राम जागृत करण्यासाठी व माहिती देण्यासाठी आलो. मदत निधी मार्च मध्ये राज ठाकरे अयोध्येत येणार आहेत. त्यावेळी गोविंद देव गिरी हे कोषाध्यक्ष आहे त्यांना देणार आहे.

हिंदुत्व अशी जी भूमीका राज ठाकरे यांची आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांच नियोजन कसे करायचे हे त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला विचारल्यास विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून त्यांना नक्कीच मदत मिळेल, असे ही सालेकर यांनी सांगितले. 

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. ते म्हणाले, विश्व हिंदू परिषदेसोबत चांगली चर्चा झाली. सगळेच राज ठाकरे यांना मदत करायला तयार आहेत, सरसंघचालक मोहन भागवात यांच्यासोबत ही त्यांचं नात चांगलं आहे. राज ठाकरे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहे.

प्रत्येक हिंदूने अयोध्येला जायला हवं. देवेंद्र फडणवीस देखील रामाला मानतात म्हणून तेही जातात. संजय राउत यांना वाटत की, शिवसेनेने काम केली आहेत. पाहूया तिथे गेल्यावर काय काम केली आहेत ती, आरती वैगरे पण पाहून येऊ असा खोचक टोला नांदगावकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 

Edited By - Amiol Jaybhaye

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख