कर्जबुडव्यांत `भाजपचे मित्र` असल्याने यादी लपविली होती : ऱाहुल गांधी

ग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र केंद्र सरकारने ही माहिती उघड करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली आहे. या सर्वांची कर्जे ३० सप्टेंबर २०१९ ला माफ केल्याची कबुली रिझर्व्ह बँकेने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत परदेशी कर्जदारांबद्दल कुठलीही माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे.
neerav modi-choksai
neerav modi-choksai

मुंबई : देशातील एकूण ५० कर्जबुडव्याचे सुमारे ६८ हजार कोटी रुपयांच्या कर्जावर रिझर्व्ह बँकेने पाणी सोडले आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्जमाफ झालेल्या उद्योगतींच्या यादीत परदेशात पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, विजय मल्या, जतीन मेहता यांचा समावेश आहे. या यादीमध्ये बाबा रामदेव यांच्या एका कंपनीलाही कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनी दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे.

या यादीवरून काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मी संसदेत देशातील बॅंका बुडविणाऱ्या 50 चोरांची यादी मागितली होती. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी मला माहिती देण्यास नकार दिला. आता रिझर्व्ह बॅंकेने नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासहित भाजपच्या मित्रांची नावे यादीत टाकली आहेत. त्यामुळे  संसदेपासून हे सत्य लपविण्यात आले, अशी टीका त्यांनी केली.  

रिझर्व्ह बँकेने ‘राईट ऑफ’ केलेल्या कर्जाची एकत्रित रक्कम ६८ हजार ६०७ कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी, पायाभूत क्षेत्रातील कंपनी, सोने-हिरे दागिने आणि औषधनिर्माण कंपन्यांचा समावेश आहे.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र केंद्र सरकारने ही माहिती उघड करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली आहे. या सर्वांची कर्जे ३० सप्टेंबर २०१९ ला माफ केल्याची कबुली रिझर्व्ह बँकेने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत परदेशी कर्जदारांबद्दल कुठलीही माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे.


टॉप कर्जबुडव्यांची नावे, बुडालेली रक्कम (आकडे कोटी रुपयांत)


मेहुस चोक्सी, गीतांजली जेम्स लिमिटेड -५४९२
संदिप झुनझुनवाला , आरईआय ॲग्रो - ४३१४
जतिन मेहता, विन्सम डायमंड- ४०७६
कोठारी बंधू, रोटोमॅट ग्लोबल प्रायवेट लि- २८५०
विजय माल्या, किंगफीशर एयरलाईंस लिमीटेड- १,९४३

कुडोस केमी - २,३२६
पंतजली आयुर्वेद, रुचि सोया इंडस्ट्रीज- २,२१२
झूम डेवलपर्स प्राइवेट लिमिटेड,- २,०१२


परदेशात पळून गेलेले उद्योगपती

कर्जमाफी पदरात पाडून घेतलेल्यांमध्ये आघाडीवर असलेला गीतांजली जेम्स आणि गिली इंडिया लिमिटेड, नक्षत्र बॉड्स या कंपन्याचा मालक मेहुल चोक्सी सध्या बार्बाडोस येथे आहे. विनसम डायमंडचा मालक जतीन मेहता देशाबाहेर पळून गेला आहे. किंगफीशरचा मालक विजय मल्या सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com