कोविड रुग्णालयांकडून अवाजवी बिल..कारवाईचा इशारा.. - private Kovid hospital Recovering bills from patient | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड रुग्णालयांकडून अवाजवी बिल..कारवाईचा इशारा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

खासगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे. 

बुलढाणा :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कोविड रुग्णालयासह खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांनी भरलेली असून बेड मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस खासगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे. 

त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांनी रुग्णालयाकडून देण्यात आलेली देयके आधी स्थानिक तहसीलदारांकडून तपासणी करून घ्यावीत आणि नंतरच तहसीलदाराच्या म्हणण्यानुसार देयके अदा करावीत, असे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णांना केले आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात एकूण 23 खासगी कोविड सेंटर कार्यरत असून या रुग्णालयांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व कोरोना संशयित रुग्ण उपचार करून घेत आहेत. 10 ते 15 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांकडून लाखो रुपयांचे देयके वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, त्यावर पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते.

यापूर्वीच सरकारने खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून देयके वसूल करण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केलेला आहे. अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसेल तर अशा रूग्णालयावर कारवाई करण्यात येईल, रुग्णांनी सुद्धा तहसीलदारांना देयके दाखवल्या शिवाय अदा करू नये, असे आवाहन डॉ. शिगणेंनी जनतेला केले आहे.

पुणे जिल्ह्यात  ८४ हजार सक्रिय कोरोना रुग्ण
 पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी (ता.७) ८४ हजार ५२६ झाली आहे. यापैकी १९ हजार ९०७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ६४ हजार ६१९ गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आज दहा हजार ९०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ६५१ रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक ४१ मृत्यू आहेत. दिवसभरात ७ हजार ८३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४ हजार ३६११, पिंपरी चिंचवडमधील २ हजार २५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७०४, नगरपालिका हद्दीतील ४६२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४८ रुग्ण आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख