चित्रा वाघ यांच्याबाबत सरकारचं सुडाचं राजकारण...दरेकरांची टीका - Pravin Darekar criticizes the government over the crime against Kishore Wagh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

चित्रा वाघ यांच्याबाबत सरकारचं सुडाचं राजकारण...दरेकरांची टीका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

सरकारच्या विरोधात आवाज उठविला की त्यांची गळचेपी करायची, अशा प्रकारचे सुडाचं राजकारण हे सरकार करीत आहेत," अशी टीका  प्रविण दरेकर यांनी केली आहे.

मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. दिनांक 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत विभागाकडून किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.   

"भाजपच्या चित्रा वाघ या लढवय्या नेत्या आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठिंशी उभा आहे. आमच्यावर कितीही प्रकारचा दबाब आणला तरी आम्ही या दबावाला बळी पडणार नाही. सरकारच्या विरोधात आवाज उठविला की त्यांची गळचेपी करायची, अशा प्रकारचे सुडाचं राजकारण हे सरकार करीत आहेत," अशी टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी याबाबत टि्वट केलं आहे. 

प्रविण दरेकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, चित्राताई वाघ या लढवय्या नेत्या आहेत. राजकीय सूड भावनेतून त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. चित्रा वाघ यांच्या पाठीशी भाजप सक्षमपणे उभा आहे. तुम्ही जेवढा त्रास द्यालं, तेवढ्याच अधिक हिमतीने आणि ताकदीने चित्राताई आपली बाजू भक्कमपणे मांडतील. कारण महाराष्ट्रातील जनतेला सत्य समजायला हवं. पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रा ताई काम करीत आहे. त्यामुळे संशयित आरोपी असलेल्या मंत्र्याला अभय द्यायचं ?, की पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा ? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवावं शेवटी राज्यातील जनता सर्वकाही बघते आहे.

"पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवतंय," असा आरोप चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 'राठोड यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीने एकी केली आहे,' असा आरोप वाघ यांनी केला आहे. 'माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मला गुंतविण्याचा सरकारचा डाव आहे,' असे वाघ यांनी सांगितले.

या प्रकरणात सर्व पुरावे असताना वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, कारण हे कोणी साधी व्यक्ती नाही, तर हे मंत्री आहेत. घटनेच्या दिवशी 100 या क्रमांकावर फोन करून या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही, असे अरूण राठोडने पुणे पोलिसांनी सांगितले होते. या दिवशी पोलिस कंट्रोलला गेलेल्या फोनची दखल का घेतली नाही, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

चित्रा वाघ म्हणाल्या, "सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवत आहे. त्या 12 आँडिओ क्लिप बाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं...महिला सुरक्षा फक्त भाषणात उरली आहे का... मंत्रीमंडळातले सर्व मंत्री एकसारखे आहेत. सरकारमध्ये व्यभिचाऱ्याचे उदात्तीकरण सुरू आहे."  पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.   

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 'पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा,' अशी मागणी हा अर्जात करण्यात आली आहे. लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी काल लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख