देशमुख यांच्या नातेवाईकांची शेल कंपन्यांत गुंतवणूक...दरेकरांचा आरोप - Pravin Darekar alleged that Anil Deshmukh relatives had invested in the shell company | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

देशमुख यांच्या नातेवाईकांची शेल कंपन्यांत गुंतवणूक...दरेकरांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

. ईडीच्या चैाकशीतून खर  समोर येईल.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ईडी आता देशमुखांची चैाकशी करणार आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर  Pravin Darekar यांनी अनिल देशमुख यांच्यावर ईडीवर गुन्हा दाखल केल्यानंतर देशमुखांवर टीका केली आहे. Pravin Darekar alleged that Anil Deshmukh relatives had invested in the shell company

प्रविण दरेकर म्हणाले की, मुंबई पोलिसांना शंभर कोटी रूपये वसुलीचे टार्गेट देशमुखांनी दिले होते. याबाबत ईडीनं हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देशमुख यांच्या नातेवाईकांची शेल कंपनीत Shell Companyगुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. ईडीच्या चैाकशीतून खरं काय ते समोर येईल.

 

अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह  (Parambir Singh)यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणात या पूर्वीही सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. १०० कोटी वसूलीबाबत ईडीही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार ईडी चौकशीसाठी देशमुख यांना समन्स करू शकते.

अनिल देशुख यांच्या भष्ट्र पद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेलं, असा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यात त्यांना काही कागदपत्रात अफरातफर केल्याचे आढळले होते. ईडीकडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधिशांची एक सदस्यीय समिती राज्य सरकाने नियुक्त केली आहे. आता या समितीला दिवाणी  अधिकार देण्यात आले आहेत. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे 

देशमुख यांनी निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप करत परमबीरसिंग यांनी त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. त्यावरून मोठी खळबळ उडाली आणि सीबीआयने पण या प्रकरणाची चौकशी सुरू करत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आणि देशमुख यांच्याविरुद्ध कठोर कारवाईस सीबीआयला मुभा दिली. हे संकट टळायच्या आधीच आणि चांदिवाल समितीचाही सामना देशमुख यांना करावा लागणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख