शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात आज कोणती रणनीती ठरणार ? - prashant kishor will meet ncp chief sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात आज कोणती रणनीती ठरणार ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे.

मुंबई : निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर हे आज राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता मुंबई येथील सिव्हर ओक येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर हे त्यांची भेट घेणार आहे. त्यांच्या भेटीत नक्की काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता आहे. prashant kishor will meet ncp chief sharad pawar

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत कोणती रणनीती ठरणार याकडे राजकीय वतुर्ळातील सगळ्याचेच लक्ष लागले आहे. ही भेट केवळ महाराष्ट्रापुरती नसून ती राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२४ च्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींविरोधात पर्याय शोधण्यासाठी विरोधकाकडून चाचपणी सुरू असल्याची सध्या चर्चा आहे. 

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॅाग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. प्रशांत किशोर यांच्यामुळे ममता बॅनर्जींचा विजयही सोपा झाला होता. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रणनीतीकार म्हणून काम केले आहे. या पार्श्वभूमी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत नक्की काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता आहे. 

या भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात जरी असलं तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची राहील. कालच निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांनी विधान केलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचे देखील स्पष्ट केलं होतं. मात्र आगामी काळात या निवडणुकीची रणनीती कशा पद्धतीची असू शकेल ?यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय 2024 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत देखील आतापासूनच रणनीती तयार करायला शरद पवार यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख