...या साठीच देवेंद्र फडणवीस पोलिस स्टेशनला गेले!

देशातील माणसे ही भाजपच्या सरकारला किड्यामुंग्यांसारखी वाटतात. त्यांना जीवाची किंमत नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
 Prakash Ambedkar, Devendra Fadnavis .jpg
Prakash Ambedkar, Devendra Fadnavis .jpg

अकोला : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पोलिस स्टेशनला कशासाठी जातात हे स्पष्ट आहे. एका कंपनीचे डायरेक्टर रेमडेसिव्हिर इंजेक्शन निर्यात करीत होते. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि निर्यात होणारी औषध थांबविली. त्यांना सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते पुढे गेले, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी सांगितले.  

अकोला येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, ही औषध निर्यातच होणार असतील तर एक गोष्ट खरी आहे की ऑक्सिजन माणसांना की कंपनीला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. देशातील माणसे ही भाजपच्या सरकारला किड्यामुंग्यांसारखी वाटतात. त्यांना जीवाची किंमत नाही, असेही आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आवाहन करतो, आतापर्यंत आपण कोरोनाची कोणती औषध कोणकोणत्या देशात आणि किती प्रमाणात पाठविली, याचा खुलासा त्यांनी करावा. 

दूध का दूध आणि पाणी का पाणी कळेल. शॉर्ट मार्केट असल्याचे सांगून, इथले लोक चोर आहेत, असे दाखवीण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत खरे उत्पादन किती आहे, हे सांगा, असा प्रश्न ही आंबेडकर यांनी केला.   

प्रकरण काय? 

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बीकेसी येथे पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात त्यांना नेण्यात आले होते.  त्यांना पोलिस स्टेशनाल नेल्या नंतर त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना विचारणा केल्याने तणाव निर्माण झाला होता. या नेत्यांची समजूत काढण्यासाठी मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बीकेसीकडे धाव घ्यावी लागली होती. 

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आल्याने या कंपनीकडे सुमारे ६० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा आहे. हा साठा महाराष्ट्रात विकण्यासाठी राज्य सरकारने या कंपनीला तातडीने परवानगी दिली आहे. तरीही औषधे मिळत नसल्याने यावरून वाद पेटला होता. 
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com