प्रकाश आंबेडकर 'राजगृह'वर, तोडफोड करणारांमागची संघटना शोधा!

प्रकाश आंबेडकर आल्याने परिसरात मोठा जमाव जमला होता
 prakash ambedkar visit rajgrah and appeals silence
prakash ambedkar visit rajgrah and appeals silence

पुणे: मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थानी झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभुमीवर त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आज 'राजगृह'ला भेट दिली. यावेळी मोठा जनसमुदाय तिथे जमला होता.

मंगळवारी सायंकाळी दादर येथील 'राजगृह' निवासस्थानावर दगडफेक करून झाडांच्या कुंड्यांची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड करणाऱ्या व्यक्ती तोंड बांधून आल्या होत्या. त्यातील एक व्यक्ती सिसिटिव्हीमध्ये दिसत आहे. काल ही घटना समजल्यानंतर राज्यभरातून निषेध सुरू झाला. आंबेडकरी अऩुयायी मोठ्या संख्येने राजगृहकडे जावू लागले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बॅरिकेडिंग केले होते. आज प्रकाश आंबेडकर यांनी राजगृहला भेट देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रकाश आंबेडकर आल्याने परिसरात मोठा जमाव जमला होता. त्यासमोर बोलताना आंबेडकर म्हणाले, पोलिस तपास सुरू आहे. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागची संघटना शोधली गेली पाहिजे. काही जण या प्रकरणाला वेगळे वळण द्यायचा प्रयत्न करत आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करा. आपला फोकस हलू देवू नका. फेसबुक, व्हाटसएपवर काही लोक प्रकरणाचे गांभिर्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून दूर राहा. शांतता पाळा, असे आवाहनही  प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

15 जिल्हा बँकासंदर्भात महत्वाचा निर्णय

मुंबई: प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय बॅंक तसेच राज्यातील अ वर्गातील 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकींग व्यवहार करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शासकीय बँकींग व्यवहार करण्यास मान्यताप्राप्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदूर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा समावेश आहे.

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भाग भांडवलामध्ये भारत सरकार 50 टक्के, पुरस्कर्ता राष्ट्रीयकृत बँक 35 टक्के व राज्यशासन टक्के याप्रमाणे हिस्सा आहे. महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कर्ता बँक आहे. त्यानुषंगाने खालील दोन प्रादेशिक ग्रामीण बँकांना शासकीय बँकींग व्यवहार करण्यास (शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तीवेतन या बाबी वगळून)  तसेच सार्वजनिक उपक्रम / महामंडळ यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मान्यता प्रदान करण्यात येत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ - कोकण ग्रामीण बँक अशा या बँका आहेत.

edited by : swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com