लशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध!  

कोरोनाकाळात केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरले आहे. कोरोनाची औषधे असोत की ऑक्सिजन असो.
लशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध!  
Naseem Khan, Prime Minister Narendra Modi .jpg

मुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान  (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. लशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध लढण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Pradesh Congress executive president Naseem Khan criticizes Prime Minister Narendra Modi) 

एकीकडे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 पर्यंतची कालमर्यादा घालून दिली आहे. मात्र, त्याचवेळी देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा ठरवली नाही, असे उत्तर केंद्र सरकारने संसदेत नुकतेच दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

कोरोनाकाळात केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरले आहे. कोरोनाची औषधे असोत की ऑक्सिजन असो. आता लसीकरणाच्या तुटवड्याची जबाबदारी केंद्राची आहे. जाणकार मंडळी तिसऱ्या लाटेची भीती वर्तवीत असताना लस हाच लोकांना वाचविण्याचा खात्रीशीर उपाय आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लशी मिळत असताना सरकारी केंद्रांवर लशींचा तुटवडा आहे, असो आरोप नसीम खान यांनी केला आहे. सर्व नागरिकांचे त्वरेने लसीकरण करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे ती जबाबदारी केंद्राला पूर्ण करता येत नाही, असेही खान म्हणले.

केंद्र सरकारने ठराविक कालमर्यादेत कोणत्याही राज्याला पुरेसा लसपुरवठा केला नाही. लस उत्पादकांनी लशी या थेट केंद्राला द्याव्यात, राज्यांना वा महापालिकांना देऊ नयेत या केंद्राच्या निर्बंधांमुळे राज्यांना आणी महापालिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचमुळे महापालिकांच्या ग्लोबल टेंडरना देखील कोणी विचारत नाही. अजूनही देशातील 90 टक्के लोकांचे लसीकरण शिल्लक असून त्याला किती वर्षे लागतील हे केंद्राने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. लशीशिवाय कोरोनाशी लढा देणे म्हणजे विनापात्याच्या तलवारीने हवेत खोटेखोटे वार करत युद्ध लढण्यासारखे आहे, हे पंतप्रधानांनी ध्यानात ठेवावे, असेही खान म्हणाले.   
 Edited By - Amol Jaybhaye 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in