बकबक करणाऱ्या संजय राऊतांची NIA ने चैाकशी करावी.. - politics sanjay raut should be questioned nia sachin vaze case congress leader sanjay nirupam | Politics Marathi News - Sarkarnama

बकबक करणाऱ्या संजय राऊतांची NIA ने चैाकशी करावी..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

काँग्रेसचे नेते  संजय निरूपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी संजय वाझेंची सुरवातीला पाठराखण करणारे खासदार संजय राऊत यांनी यू टर्न घेतला आहे, यावरून काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय निरूपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे. निरूपम यांनी टि्वट करीत राऊतांवर टीका केली आहे. 

"सचिन वाझे यांनी पुन्हा पोलिस दलात घेतल्यास अडचणी येतील, असे मी सांगितले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मग कोणत्या नेत्यांच्या सांगण्यावरून वाझेंना पोलिस दलात घेण्यात आले," असा सवाल निरूपम यांनी उपस्थित केला आहे. "NIA (एनआयए) ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांना उचलून सचिन वाझेंवर वरदहस्त असणाऱ्या नेत्याचा शोध घेतला पाहिजे," असे निरूपम यांनी टि्वट केलं आहे. 

"सचिन वाझेंना पोलिस दलात घेतले, तेव्हा वाझेंच्या स्वभावामुळे अडचणी निर्माण होतील, असे मी वरिष्ठ नेते, अधिकाऱ्यांना सांगितले होते. कोणताही अधिकारी वाईट नसतो. त्याला परिस्थिती वाईट बनविते, ज्या प्रमाणे हे प्रकरण घडले, ते लक्षात घेता यावर कुणाचेही नियंत्रण राहिलं नसेल. वाझें प्रकरणातून नेत्यांनी धडा घेतला पाहिजे," असे राऊत म्हणाले होते. 

अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकणात एनआयएच्या (NIA) अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हीआऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.  

ही आऊटलँडर कामोठे (Kamothe) परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना (Police) दिली. ज्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे(Sachin Waze) नावाची व्यक्ती असल्याचं स्पष्ट झाले आहे. एनआयएची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.

आतापर्यंत एनआयएला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, १ प्राडो, १ इनोव्हा, अँटिलिया बाहेर स्फोटके सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर (Outlander) अश्या सहा गाड्या मिळालेल्या आहेत. या व्यतिरिक्त एनआयए अजून एक आऊटलँडर, ऑडी (Audi) आणि स्कोडा (Scoda) या गाड्यांच्या शोधात आहे.

 Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख