प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी नाही.. 

भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील
3Sarkarnaa_20Banner_20_2831_29_1.jpg
3Sarkarnaa_20Banner_20_2831_29_1.jpg

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत ते बोलत होते.  politics prashant kishor will not campaign to ncp says nawab malik

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे. ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे यांनाही ते भेटले होते, पण ही भूमिका थेट नव्हती, अनौपचारिक केलेली मदत शिवसेनेला शिवसेनेला सत्तास्थापणेसाठी खूप फायदेशीर ठरली. 2024 च्या निवडणुका जरी लांबणीवर असला तरी त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापासूनच केलीय. अनेक बैठका, चर्चा, त्याचप्रमाणे मतदार त्यांच्याशी संवाद अशा पद्धतीची तयारी सध्या राष्ट्रवादीची तर सुरूच आहे. पण याच सोबत प्रशांत किशोर यांची साथ मिळाली ते 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यास मदत होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे. 

नवी दिल्ली : आगामी पंजाब विधानसभा निवडणुक ही बहुजन समाज पक्षासोबत लढण्याच्या निर्णय शिरोमणी अकाली दलाने घेतला आहे. आज चंडीगढ येथे याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बसपाचे महासचिव सतीश मिश्रा आणि अकाली दलाचे नेते सुखबीर बादल आज युतीची घोषणा करणार आहेत. यापूर्वी १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत अकाली दल आणि बसपा यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. बसपा नेते कांशीराम हे विजयी झाले होते. पंजाबमध्ये ३३ टक्के दलित व्होट बॅक ही निवडणुकीत महत्वाची समजली जाते. दोन्ही पक्षामध्ये जागा वाटपावरुन चर्चा झाली आहे. अकाली दलाने बसपाला १८ जागा दिल्याचे समजते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com