देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना का हात जोडले... - Politics devendra fadnavis uddhav thackeray cm mumbai metro carshed mumbai metro | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना का हात जोडले...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 डिसेंबर 2020

"प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही.

मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडबाबत सत्ताधारी आणि विरोधक आरोपप्रत्यारोप करीत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी मेट्रो कारशेडबाबत विरोधकांना चांगलच धारेवर धरलं. यावरून माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. 

फडणवीस म्हणाले, "मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!" असं टि्वट करून फडणवीस यांनी मेट्रोबाबत ठाकरे सरकारने जनतेची दिशाभूल करू नये, अशी विनंती केली आहे. 

फडणवीस आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला"

ते म्हणाले की बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80%पूर्ण होत आहे.आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार!
मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे,त्यांना आणखी त्रास नको.हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका,ही हात जोडून विनंती आहे!

30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा Red exclamation mark symbolकांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. 

"मुंबईकरांसाठी मी अंहकारी आहे..जे जनतेच्या हिताचं तेच मी करेन.."
"मुंबईकरांसाठी मी अंहकारी आहे. जनतेच्या हिता जे योग्य तेच मी करेन," असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आज समाजमाध्यमांवरुन राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. कांजूरमार्ग मेट्रो शेडसाठी विरोध केला जात आहे. विरोधीपक्ष हा विषय प्रतिष्ठेचा करीत आहे.  प्रकल्प अडविण्याचा कद्रुपणा करू नका, हा प्रकल्प तुमच्या आमच्या अहंकारासाठी नाही, तर जनतेच्या हितासाठी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "माझा अहंकार आहे की कर्तव्य आहे, ते जनतेला माहित आहे. कांजूरमार्ग मेट्रोसाठी केंद्र सरकार न्यायालयात गेले. बीकेसीची जागा राज्याची आहे. ही जागा आम्ही केंद्राला दिली. त्यावेळी कोणतीही खळखळ केली नाही. ही जागा केंद्र किंवा राज्याची नव्हे तर जनतेची जागा आहे. त्यांच्या वापरावरून राजकारण करू नये. आपण जनतेचे सेवक आहोत. हे लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे. 
(Edited  by : Mangesh Mahale) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख