पवारांनी उद्धघाटन केलेल्या योजनेला उद्धव ठाकरेंची स्थगिती, महाविकास आघाडीत वाद - political uddhav Thackeray postpones Jitendra Awhad decision to give flats to Tata Hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

पवारांनी उद्धघाटन केलेल्या योजनेला उद्धव ठाकरेंची स्थगिती, महाविकास आघाडीत वाद

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 जून 2021

टाटा कॅन्सर रुग्णालयाला आव्हाड यांनी दिलेल्या खोल्याना शिवसेना आमदारांचा विरोध आहे.

मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड हे नाराज झाले आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाला आव्हाड यांनी दिलेल्या खोल्याना शिवसेना आमदारांचा विरोध आहे. political uddhav Thackeray postpones Jitendra Awhad decision to give flats to Tata Hospital

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या नुकत्याच रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. 

ता. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. यावेळी जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. 300 चौरस फुट असलेले 100 फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास दिले आहेत. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली आहे.  

आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रातील काही मुद्दे  

१)सुखकर्ता को ऑप. या पुरभित हमारतीमध्ये ७५० मराठी कुटूंब आहेत. ही इमारत ३३ (९)अंतर्गत पुर्नविकसित करण्यात आल्या असल्याने या ठिकाणी प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. 
२)या सदनिका तयार करण्यात आलेल्या रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायमस्वरूपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याकरीता रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.
३)या निर्णयामुळे या इमारतीमधील ७५० कुंटुबांमध्ये भिती निर्माण झाली आहे. भोईवाडा येथील मादा गृहसंकुलामधील तयार असलेली संपूर्ण इमारत व नातेवाईकांना राहण्याकरीता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
४) कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कॅन्सरमध्ये मोठया प्रमाणात होत असल्याने या सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील कामगार सदन, त्रिवेणी सदन, मेहता मेशन, सिंधुदुर्ग इमारत धरमशी मेशर या इमारती मधील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च ; काश्मिर प्रश्नांवरुन पाकिस्तानवर हल्लाबोल
मुंबई : काश्मिरप्रश्नावरुन आजच्या  'सामना 'च्या अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे.इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले, असा टोला  'सामना'च्या अग्रलेखातून इम्रान खान यांना लगावला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख