“मोदीजी, अजून किती फेकणार, हद्द झाली राव...” नाना पटोलेंचा टोला - political congress nana patole pm narendra modi bangaladesh tour | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

“मोदीजी, अजून किती फेकणार, हद्द झाली राव...” नाना पटोलेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

मोदींच्या व्यक्तव्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. 

मुंबई :  "बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी मी माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले आणि यासाठी मला तुरुंगातही जावे लागले. हे मी अतिशय अभिमानाने बांगलादेशातील जनतेला सांगत आहे, असे व्यक्तव्य  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले होते. मोदींच्या या व्यक्तव्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. 
 

"और कितना फेकोंगे मोदी जी.....हमारे मराठी मे एक लाईन है.... हद झाली राव.. किसान आंदोलन कर कर एक शब्द तक आपके मुह से निकला नही.... और आझादी की बात करने बांग्लादेश जाते हो...... किसानो को आंदोलनजीवी आपने कहा था.... आप कोण हुए अब ढोंगीजीवी," असे टि्वट करत पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

 

नरेंद्र मोदींनी ढाका येथील एका कार्यक्रमात सांगितले की, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.  
  
मोदी हे बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मोदींनी काल मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या सर्व हुतात्म्यांनी सत्याच्या विजयासाठी अन्यायायाविरोधात लढा दिल्याची भावना त्यांनी काल व्यक्त केली. बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नॅशनल परेड स्क्वेअरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली. या वेळी ते म्हणाले की, बांगलादेशच्या मुक्तीलढ्यामध्ये आमच्या जवानांनीही रक्त सांडले. दोन्ही देशांमधील रक्ताचे हेच नाते अत्यंत मजबूत अशा द्विपक्षीय संबंधांना जन्म देईल.  

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मोदींनी काल बांगलादेशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्या मैत्रीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होतील. वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष दोन्ही देशांमधील संबंधांना आणखी बळकट करण्यास हातभाग लावेल. वंगबंधूंनी सामान्यांसाठी मोठा त्याग केला. त्यांना गांधी शांती सन्मान देता आला ही भारतीयांसाठीही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. 

मोदींनी भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वंगबंधूंचे आदर्श आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दूरदृष्टीवर वाटचाल करण्याचा आहे. मुक्तियोद्ध्यांच्या भावनांचे स्मरण करण्याची हीच वेळ आहे. बांगलादेशच्या मुक्तीलढ्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता. या लढ्यातील इंदिरा गांधींचे योगदान सर्वांनाच माहिती आहे. खुद्द अटलबिहारी वाजपेयींनी या मुक्तीलढ्यातील क्रांतिकारकांचे कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. विशीमध्ये असतानाच मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तेव्हा माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले होते. त्यावेळी मी बांगलादेशसाठी तुरुंगवासही भोगला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख