बाळा नांदगावकर पोलिसांच्या ताब्यात ; राम कदम स्थानबद्ध

पोलिसांनी आपल्याला स्थानबद्ध केले असल्याचे राम कदम यांनी टि्वट करीत म्हटलं आहे.
Sarkarnama (36).jpg
Sarkarnama (36).jpg

मुंबई : दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप आणि मनसेने हट्टाने हंडी बांधायला सुरुवात केली असली तरी, दहीहंडी सार्वजनिक साजरी करता येणारच नसून नियमात कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचे गृह विभागान काल पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दहीहंडी Dahihandi साजरी करणाऱ्या मनसे कार्यक्रर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

भाजपचे आमदार राम कदम Ram Kadam यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. दहीहंडी फोडण्यापूर्वी पोलिस राम कदम यांच्या घरी पोहचले आहेत. पोलिसांनी आपल्याला स्थानबद्ध केले असल्याचे राम कदम यांनी टि्वट करीत म्हटलं आहे. काळा चाैकी येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदगावकर यांनी दहीहंडी फोडल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

राम कदम यांनी देखील आम्ही दहीहंडी फोडणारच असं म्हटलं आहे. ''आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पारंपारिक दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात निघत आहोत. मात्र आम्हाला घरीच स्थानबद्ध करण्याची तयारी सरकार करत आहे. काहीही झाले तरी दहीहंडी होणारच,''असं कदम यांनी म्हटलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत मनसेने ठाकरे सरकारचा निषेध करीत दहीहंडी उत्सव साजरा केला. साकीनाका येथे पोलिस आणि मनसेची बाचाबाची झाली. पोलिस आणि मनसे आमनेसामने आल्याने वाद निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

दहीहंडी साजरी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर भाजप आणि मनसेकडून राजकीय दबाव टाकला जात असला तरी महाविकास आघाडीने या दबावाला बळी न पडता कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाने काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या २७ ऑगस्टच्या पत्राचा हवाला दिला आहे. 

सरकारचा इंग्रजी शाळांना दणका ; नवा आदेश 
गणेशोत्सव आणि दहीहंडी या सणांच्या निमित्ताने लोक एकत्र आल्यास कोरोना संसर्गामध्ये वाढ होणार असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या उत्सवावर सामूहिकरीत्या एकत्र येण्यास कडक निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याची सूचनाही केली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव सामूहिकरीत्या साजरे केले जाऊ नये अशी सूचना केंद्र सरकारने केली असल्याकडेही या परिपत्रकाद्वारे राज्य सरकारने लक्ष वेधले आहे.

दहीहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची अधिक भीती असल्याने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जाऊ नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. दहीहंडीऐवजी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेण्याचे आवाहनही या परिपत्रकात करण्यात आले आहे.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com