रुग्णालय आगप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक 

रुग्णालयाला आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात कोरोनाचे १७ रुग्ण उपचार घेत होते.
Police have arrested two officers of Vijay Vallabh COVID hospital
Police have arrested two officers of Vijay Vallabh COVID hospital

मुंबई : विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 15 कोरोना रुग्णांचा शुक्रवारी (ता. २३ एप्रिल) पहाटे होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक अंदाजानुसार ही आग एसीचा स्फोट झाल्याने लागल्याचे समजते.

रुग्णालयाला आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात कोरोनाचे १७ रुग्ण उपचार घेत होते. पहाटेच्या वेळी आग लागल्याने बहुतेक जण झोपले होते. तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षातही लवकर ही बाब आली नाही. त्यामुळे आगीचा भडका उडाला. संपुर्ण अतिदक्षता विभागात आग पसरल्याने रुग्णांना वाचविणे शक्य झाले नाही. त्यामुळे 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात यश आले. तसेच रुग्णालयातील इतर विभागातील रुग्णांनाही अन्यत्र हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर दोन दिवसांतच दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त डॅा. महेश पाटील यांनी दिली.

दरम्यान, रुग्णालयास आग लागली तेव्हा रुग्णालयात ९० रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना घडली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी झोपले होते आणि आयसीयूतील रुग्णांना बाहेर काढण्यासह कुणी नव्हते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले होते. नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसीचा स्फोट झाला. या अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला परंतु, आयसीयूतील 15 रुग्णांचा मात्र, मृत्यू झाला. या रुग्णालयात एकूण ९० जणांवर उपचार सुरू होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com