फोटोग्राफर आले अन्‌ स्वतःचेच फोटो काढून गेले : ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्यावर भातखळकरांची टिका 

पूरग्रस्तांनो तुम्ही काळजी घ्या, सावध राहा, पण एवढ्यात मी मदत जाहीर करणार नाही, हे सांगायला ठाकरे यांना सोलापूरला जायची गरज नव्हती.
Photographers came and took photos of themselves: Bhatkhalkar criticizes Thackeray's visit to Solapur
Photographers came and took photos of themselves: Bhatkhalkar criticizes Thackeray's visit to Solapur

मुंबई : पूरग्रस्तांना मदत नाकारणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी, "सोलापूरच्या आकाशात तोंडच्या वाफेचे ढग,' असा टोला लगावला आहे. "फोटोग्राफर आले अन स्वतःचे फोटो काढून गेले,' अशी बोचरी टीकाही त्यांनी ठाकरे यांच्यावर "ट्विट'द्वारे केली आहे. 

आश्वासनेच द्यायची होती, तर निदान मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ तरी जाहीर करायला हवा होता. त्यामुळे सरकारी यंत्रणा तरी हलली असती व मदत देण्यास सुरुवात तरी झाली असती. मात्र, त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली, हे योग्य नाही, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले. 

मदत इतक्‍या लवकर जाहीर करणार नाही, असे ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यात सांगितले. मात्र, आता पूर येऊन आठ दिवस झाले आहेत. निदान मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ व नजर पंचनामे जाहीर केले असते, तर त्या निकषांनुसार पुढील कार्यवाही झाली असती. त्याप्रमाणे सरकारी यंत्रणेने तात्पुरते निवारे, वीजपुरवठा इत्यादी कामे सुरु केली असती. मात्र, ओला दुष्काळग्रस्तांना यातले काहीही मिळाले नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली. 

स्वतः मदत जाहीर करण्याऐवजी ठाकरे केंद्राकडे मदत मागत आहेत. पण राज्याने मदत दिली तर त्यानुसार केंद्र सरकार मदत देते. आमच्याकडे पैसे नाहीत, म्हणून मदत देणार नाही, असे राज्य सरकार म्हणत आहे. मात्र, राज्य सरकारकडे पैसे नाहीत असे कधीच होत नाही.

निदान राज्य सरकारने ठरलेल्या निकषांनुसार केंद्राला अहवाल पाठवावा, त्यानुसार केंद्र सरकार नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीसाठी पथक पाठवेल. काही महिन्यांपूर्वी कोकणातही केंद्राचे पथक आले होते, मात्र त्याला उशीर झाला होता. याचे कारण म्हणजे मुळात राज्याने केंद्राला यासंदर्भात जेमतेम एक पानी पत्र पाठविले होते. याबाबतीतल्या निकषांनुसार हे पत्र जायला हवे होते, ते झाले नाही, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले. 

पूरग्रस्तांनो तुम्ही काळजी घ्या, सावध राहा, पण एवढ्यात मी मदत जाहीर करणार नाही, हे सांगायला ठाकरे यांना सोलापूरला जायची गरज नव्हती. ते नेहमीप्रमाणे घरबसल्याही सांगता आले असते, असा टोला लगावून भातखळकर पुढे म्हणाले की, राज्याचा प्रशासनप्रमुख या नात्याने आपण या विषयावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ, असे ठाकरे यांनी जाहीर करायला हवे होते. त्याऐवजी ते फडणवीसांवर टीका करण्यास मश्‍गुल आहेत. 
 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com