कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणातील आरोपींची भाजपशी लिंक?  - Photo of accused in Rajesh Sapte suicide case with BJP leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणातील आरोपींची भाजपशी लिंक? 

उत्तम कुटे 
सोमवार, 5 जुलै 2021

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याबाबत तक्रारही करण्यात आली आहे.

पिंपरी : मराठी कला दिग्दर्शक राजेश तथा राजू साप्ते यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्यातील चार आरोपींचे भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि आमदार राम कदम (Ram Kadam) यांच्याबरोबर फोटो आढळल्याने शिवसेनेच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. दरम्यान, राज्य विधीमंडळाच्या आज सुरु झालेल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात यावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे. (Photo of accused in Rajesh Sapte suicide case with BJP leaders)  

हेही वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच १० मिनिटात मुनगंटीवार आणि भास्कर जाधव यांच्यात चकमक

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांच्या कंपनीने पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामात ११० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप नुकताच पिंपरी-चिंचवड शिवसेनेने केला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याबाबत तक्रारही करण्यात आली आहे. आज सामनात त्यावर अग्रलेख आला असून त्यात लाड यांची ईडीने चौकशी करण्याची मागणी केली गेली आहे. अन्यथा राज्य पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग ती करील, असे सुतोवाच करण्यात आले आहे. एकंदरीतच लाड यांच्यानंतर आता शिवसेना साप्ते प्रकरणावरून त्यांचे दुसरे आमदार कदम, खासदार कोटक, माजी खासदार सोमय्या यांना लक्ष्य करण्याची दाट शक्यता आहे. त्यातही सोमय्या यांनी शिवसेनेला अधिक अडचणीत आणले असल्याने ते पहिले त्यांच्या निशाण्यावर असतील.

साप्ते यांनी मुंबईच्या चित्रनगरीतील फिल्म स्टुडिओ सेटिंग अॅन्ड अलाईड मजदूर युनियन पदाधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून शनिवारी (ता.३) ताथवडे, पिंपरी-चिंचवड येथे आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आणि चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये युनियनचा खजिनदार राकेश मोर्या तसेच गंगेश्वरलाल श्रीवास्तव, नरेश विश्वकर्मा आणि अशोक दुबे यांच्या छळवणुकीला कंटाळून जीव देत असल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा : तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते!

या सर्व आरोपींचे फोटो कदम, कोटक व सोमय्यांबरोबर आढळून आले आहे. आमदारांशी ते अधिक सबंधित असल्याचे समजते. यासंदर्भात कदम व सोमय्यांशी साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. तर, असे अनेकजण भेटायला येतात, त्यावेळी फोटो काढलेला असेल, असे कोटक यांनी 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. मात्र, साप्ते प्रकरणातील आरोपींविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख