पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अंधारात नव्हे; तर दिवसाढवळ्या ठेवणार : जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला 

गेल्या सात ते आठ दिवसांत भारतीय जनतापक्षाच्याविविध भागातील 4 ते 5 नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे.
The party entry program is not in the dark;  I will keep it a day : Jayant Patil scoffs at Fadnavis
The party entry program is not in the dark; I will keep it a day : Jayant Patil scoffs at Fadnavis

मुंबई : "निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेले लोकही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परत येतील. तेही तुम्हाला कळेलच, आम्ही अंधारात नव्हे; तर दिवसाढवळ्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवणार आहोत, ते ज्या वेळी पक्षात परत येतील, त्या वेळी तुम्हाला नक्की कळविण्यात येईल,' असे सांगून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा टोला लगावला. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. 

नाथाभाऊ यांच्यासोबत कोण कोण पक्षात प्रवेश करणार, याबाबत जयंत पाटील म्हणाले, "खडसे यांचे नेतृत्व मान्य असणारे अनेक नेते आहेत. मात्र, जे घटनात्मक पदावर आहेत, म्हणजे ज्यांना राजीनामा देऊन परत निवडणूक लढवावी लागणार आहे, अशा लोकांना आम्ही थोडे दिवस थांबवणार आहोत. कारण सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. अशा काळात निवडणूक घ्यावी, असे आम्हाला वाटत नाही. कोरोनाचा काळात कोणतेही राजकारण आम्हाला करायचे नाही.' 

राज्यातील काही लोकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, आम्ही टप्पाटप्याने आणि ज्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे, अशाच लोकांना प्रवेश देणार आहोत. असे सांगून पाटील म्हणाले की गेल्या सात ते आठ दिवसांत विविध भागातील भारतीय जनता पक्षाच्या 4 ते 5 नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे. पण, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी जे लोक पक्ष सोडून गेले, ते परत येणार का? या प्रश्‍नावर पाटील म्हणाले की, तेही परत येतील, तेही तुम्हाला दिसेलच. आपण त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम अंधारात घेणार नसून त्यांना दिवसाढवळ्या प्रवेश देणार आहोत, असे नमूद करत पाटील यांनी फडणवीसांच्या पहाटेच्या वेळी घेतलेल्या शपथविधीवरून टोमणा मारला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com