खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पंकजा मुंडेंचे एकाच वाक्यात उत्तर - pankaja Munde Answar was one statement in khadase | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पंकजा मुंडेंचे एकाच वाक्यात उत्तर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहेत.

मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे गेले अनेक दिवस पक्ष बदलणार अशी चर्चा सर्वत्र होत असताना पंकजा मुंडे मात्र या चर्चेकडे  केवळ चर्चा म्हणून पाहतात. भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस झालेल्या पंकजा यांनी खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहेत. त्यावर पंकजा यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. या चर्चा सत्यात कधीच उतरत नसतात. राजकारणात चर्चा होतच राहतात. अशा चर्चांना मी गांभीर्याने घेत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना लाॅकडाऊनच्या काळात तुम्ही घराबाहेर दिसल्या नाहीत, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की मी या काळात आजारी होते. त्यामुळे फारसे फिरले नाही. यापुढे मी अॅक्टिव्ह राहील.पक्षाने नव्याने दिलेली निष्ठेने पार पाडेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणा प्रश्नी बोलताना त्या म्हणाल्या की मराठा समाजाच्या आरक्षणावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही आणि आमचा पक्ष नेहमीच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात लढलो आहे. या सरकारने मात्र घोर निराशा केली आहे. मराठा समजला लवकरात लवकर आरक्षण मिळावे. कोणत्याही प्रकारे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान न होता एमपीएससी परीक्षा घेण्यात याव्यात, असेही त्या म्हणाल्या. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख