कराडांना मंत्रिपद; पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव  

कराड गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले.
 Pankaja Munde, Bhagwat Karad .jpg
Pankaja Munde, Bhagwat Karad .jpg

मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी झाला. या विस्तारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. जुन्या मंत्र्यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून नव्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली. यात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे याचेही नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे  (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे या भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहे. या विषयी सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. (Pankaja Munde and Pritam Munde are Discussion to be upset)  

''भागवत कराड यांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. कराड राज्यमंत्री झाले. त्यामागे पंकजा मुंडे यांना संपुर्ण खतम करण्याचा डाव आहे. कराड गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले. प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले, अशी शंका घ्यायला जागा आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे. 

राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरे झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस त्यानंतर भाजप असा त्यांचा प्रवास आहे. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते. त्यांना लघु व मध्यम उद्योग असे एक खाते दिले गेले. ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्रीही नाहीत. समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले गेले नाही ती. 

त्यांना देशातील लघु आणि मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातील उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना जिवंत राहणे अवघड आहे. या परिस्थितीत नारायण राणे काय करणार ते पाहायला हवे. राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ देशपातळीवरची खाती सांभाळण्याची आहे, आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्र सरकारने एक 'सहकार खाते' निर्माण केले. 'सहकार' हा राज्याच्या अखत्यारीतला विषय, पण आता 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये व संघराज्यरचनेवर आघात ठरू नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शुभेच्छा देऊन मागील पानावरून पुढे जाणे इतकेच आपल्या हाती आहे.

Edited By - Amol Jaybhaye    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com