'RSSने आता आपल्या मुलानाही नाकारलं ; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

माकडाप्रमाणे बुडायला लागले, तर मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
'RSSने आता आपल्या मुलानाही नाकारलं ; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र
4Sarkarnama_20Banner_20_2818_29_5.jpg

मुंबई : 'पांचजन्य'मधून panchjanya आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी 'इन्फोसिस'वर  infosys नुकतीच टीका करण्यात आली होती. आएसएसने 'पांचजन्य'शी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर prakash ambedkar यांनी rss आरएसएसवर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी टि्वट करुन आरएसएसवर टीका केली आहे. 

आपल्या टि्वटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कोणत्याही थराला जाऊ शकते. पांचजन्य आपलं मुखपत्र असल्याचं ते स्वतः सांगतात. याच पांचजन्यमधून इन्फोसिस कंपनीला देशविरोधी म्हटलं गेलं. पण विरोध होताच आता आरएसएसने आता आपल्या मुलानाही नाकारलं आहे. माकडाप्रमाणे बुडायला लागले, तर मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

शिवसेनेचा भाजपवर घणाघात ; एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसशी सलग्नित असलेल्या पांचजन्य मासिकातून इन्फोसिसवर टीका करण्यात आली होती. इन्फोसिसने जाणीवपूर्वक भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

असं आहे तालिबानचं नवं मंत्रिमंडळ ; महिलांकडे एकही खातं नाही. 
काबूल : काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं  Taliban सरकार स्थापन होणार अशा चर्चा सुरू होत्या. काल अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापन केलं आहे. आज  नव्या सरकारचा new cabinet सूत्रे घेण्याचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तालिबानने मुल्ला मोहम्मद अखुंदजादा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं आहे. महिलांकडे एकही खातं या सरकारमध्ये देण्यात आलेलं नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in