पूरग्रस्तांसाठी सरकारची मोठी घोषणा : तातडीची मदत म्हणून साडेअकरा हजार कोटी जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले होते.
  Chief Minister Uddhav Thackeray .jpg
Chief Minister Uddhav Thackeray .jpg

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या मदतीला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले.  (A package of Rs 11,500 crore has been announced for flood relief) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले होते. पूरग्रस्तांना मदत दिली जाईलच मात्र, त्याच बरोबर पुराच्या समस्येवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याचेही आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे तातडीची ११ हजार ५०० कोटीच्या खर्चास मान्यता दिली आहे. 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमूळे दरडी कोसळून मोठे नुकासान झाले आहे. त्यावर सविस्तर दीर्घकालीन योजना आपण आखत आहोत. त्यासाठी ११ हजार ५०० कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे, असे राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. NDRF च्या निकक्षापेक्षा अधिक, १० हजार सानुग्रह अनुदान आणि दुकानदारांना ५० हजार रुपये मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. घर पूर्ण पडले असल्यास १ लाख ५० हजार रुपये आणि अर्ध घर पडले असल्यास ५० हजार व घराचे कमी पण काही प्रमाणात नुकसान झाले असल्यास १५ हजार रुपये मदत केली जाणार आहे. ८० टक्के माहिती आली आहे. अजून जाही पंचनामे व्हायचे आहेत, ४ लाख हेक्टर शेतीच नुकसान झाले आहे. घोषणा आज केली आहे. उद्यापासून मदत करायला आपण सुरुवात करणार आहोत.

पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीची पूर्ण मदत केली जाईल. म्हाडाच्या माध्यमातून दरडी कोसळून गावांचे नुकसाना झाले आहे. त्यांचे पुनर्वसन केल जाणार आहे. त्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. स्वतंत्र धोरण त्यासाठी आखले जाणार आहे. त्यात धोकादायक गावांचा समावेश केला जाणार आहे. प्राण्यांच्या बाबतीत निकशाच्या पलीकडे जाऊन मदत केली जाईल. ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी मदत ही चेक ने दिली जाणार आहे, रोख रक्कम देणार नाही. त्यामुळे गोंधळ होणार नाही. आम्ही आढावा पूर्ण झाल्यावर केंद्राकडेही मदतीसाठी पत्र पठाऊ. पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. गरज लागली तर आणखी मदत वाढवून दिली जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com