भगव्याला विरोध करणारे नतद्रष्ट कोण?..भगवा होता म्हणून तिरंगा फडकला.. - our dream to fly the saffron flag at the government office Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

भगव्याला विरोध करणारे नतद्रष्ट कोण?..भगवा होता म्हणून तिरंगा फडकला..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आहे. याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत ?

मुंबई : "शिवस्वराज्य दिनी शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये," अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. सदावर्ते यांच्या या मागणीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राऊत आज माध्यमांशी बोलत होते. our dream to fly the saffron flag at the government office Sanjay Raut

संजय राऊत म्हणाले की, भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आहे. याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत ? अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहिल अशी कार्यवाही सरकारने करावी. भगवा झेंडा शासकीय कार्यालयावर फडकवणे हे आपलं स्वप्न आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला हे ज्यांना कळत नाही, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.

शिवस्वराज्य दिनी शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंग्याखेरीज अन्य कोणत्याही धर्मीय ध्वजारोहणाला आपला विरोध असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे आहे. आपल्या या भूमिकेस राज्यातील विद्यार्थी, कर्मचारी, सर्वधर्मीय नागरिक यांनी पाठिंबा दिल्याचा सदावर्ते यांचा दावा आहे. तिरंग्याखेरीज अन्य ध्वज शासकीय कार्यालयावर लावण्यासाठी आपण उपस्थित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

खेड पंचायत समितीच्या सभापतीपदावरुन सध्या महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर वाद आहे. याबाबत राऊत म्हणाले की, खेडमध्ये शिवसेनेच्या सदस्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्न झाला. त्यांना आमिष दाखविण्यात आले. हा प्रकार स्थानिक नेत्यांनी घडवून आणला आहे. याच्याशी अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा काहीही संबध नाही. आपण महाविकास आघाडीत आहोत. दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकाविषयी निर्णय घेताना त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तो नियम तोडत असाल तर तो अधिकार आम्हाला देखील आहे.

आरक्षणाबाबत सरकारची सतत चालढकल का ? चंद्रकांत पाटलांचा सवाल..
 मुंबई : मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका राज्य सरकारने दाखल करण्याची मुदत संपली. मराठा आरक्षण किंवा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सतत चालढकल का करत आहे, असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.  चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल ५ मे रोजी दिल्यानंतर एक महिन्यात ४ जूनपर्यंत त्याला आव्हान देणारी फेरविचार याचिका दाखल करणे गरजेचे होते. केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीविषयी तातडीने फेरविचार याचिका दाखल केली. परंतु राज्य सरकारने मात्र दिरंगाई केली आणि मुदत संपेपर्यंत फेरविचार याचिका दाखल केली नाही. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत दिरंगाई केल्यामुळे गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख