राऊत म्हणाले, ''लक्षात ठेवा जेलमधल्या इतर व्यक्तीही पत्र लिहू शकतात'' - other people in jail can also write letter Sanjay Raut  | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत म्हणाले, ''लक्षात ठेवा जेलमधल्या इतर व्यक्तीही पत्र लिहू शकतात''

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विरोधकांवर टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात घडलं नाही. मात्र, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही.

राऊत आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''जेल मधील पत्रलेखन हा संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे. असे काही पत्रलेखक इतरांना देखील मिळू शकतात. एकंदरीत सर्व स्तरावर गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील हे सगळ्यात मोठे साडेतीन अती शहाण्यांचे कारस्थान दिसतेय. लक्षात ठेवा जेलमधल्या इतर व्यक्तीही पत्र लिहू शकतात''  

''अनिल परब यांच्यावर आरोप करणारा पत्रलेखक सध्या एनआआयएच्या ताब्यात आहे. हा पत्रलेखक संत किंवा महात्मा आहे का, यावर भाजपनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मात्र, जेलमध्ये आणखी काही व्यक्ती आहेत. त्यादेखील पत्र लिहू शकतात. विरोधक हे सरकारमधील मंत्र्यांचे चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लॉकअपमधील आरोपींकडून काही गोष्टी वदवून घेतल्या जात आहेत.''  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख