भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेलाही दणका...थेट प्रक्षेपणही बंद - Order to close the proceedings of the BJP-affiliated assembly | Politics Marathi News - Sarkarnama

भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेलाही दणका...थेट प्रक्षेपणही बंद

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला होता.

मुंबई : भाजपने अधिवेशनावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या बाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. वृत्तवाहिन्यांवरुन या अभिरुप विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू केल्याने आक्षेप घेण्यात आला. यावर हे प्रक्षेपण तातडीने थांबवण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले.  (Order to close the proceedings of the BJP-affiliated assembly) 

आमदारांच्या निलंबनानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केले. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने प्रतिविधानसभा भरवली. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे होते. मात्र, या साठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ते थांबवण्याचे आदेश देण्यात आले. 

भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेच्या आवारात परवानगी नसताना काहीही करता येत नाही. विरोधक तिथे स्पीकर लावून भाषणे देत आहेत. भास्कर जाधव यांच्या आक्षेपावर अध्यक्षांनी सांगितले, होते की विरोधी पक्षाने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांचा माईक बंद केला पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली होती. त्यानंतर भास्कर जाधव यांची तालिका अध्यक्ष पदी नियक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या अभिरुप विधानसभेचे कामकाज बंद करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत सरकारच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धिक्कार प्रस्ताव मांडला. त्यावर भाजपच्या अनेक आमदारांनी आपली मते मांडली. प्रतिविधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. "शेतकरी, ओबीसी, मराठा, आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केले. जे घडलेच नाही; ते घडले आहे, असे सांगून धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केले. म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो, असे फडणवीस म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख