नवाब मलिक जेवढे कमी बोलतील तेवढ्या अडचणी कमी होतील!

मलिक फक्त अन्य राज्यांची आपल्याला सोयीची उदाहरणे देऊन केंद्रावर टीका करणे एवढेच काम रोजच्या पत्रकार परिषदांमधून करतात.
 Nawab Malik, Praveen Darekar .jpg
Nawab Malik, Praveen Darekar .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) जेवढे कमी बोलतील तेवढ्या अडचणी कमी होतील, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Opposition leader Praveen Darekar criticizes Nawab Malik)

राष्ट्रवादीचे (Ncp) प्रवक्ते असलेले मलिक फक्त अन्य राज्यांची आपल्याला सोयीची उदाहरणे देऊन केंद्रावर टीका करणे एवढेच काम रोजच्या पत्रकार परिषदांमधून करतात. कोरोनाच्या संकटकाळात आपले राजकारण पुढे नेण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. त्याखेरीज कोरोनासंदर्भात रचनात्मक उपाय आदींबाबत काहीही बोलत नाहीत. केवळ केंद्र विरुद्ध राज्य असेच चित्र ते उभे करतात, अशी वक्तव्ये त्यांनी थांबवली पाहिजेत, असे दरेकर म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांनी हा वादविवाद थांबवत व्यापक दृष्टीने विचार करावा. तसेच कोरोनाच्या या संकटकाळात सर्व पक्ष मिळून काम करून, समन्वयातून कोरोना संकट दुरू करण्यासाठी झटूया, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली. 
 
''नवाब मलिक यांच्या रोजच्या पत्रकारपरिषदांमधील व्यक्तव्यातून राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेबद्दल उपाययोजना सुचवण्यासंदर्भात कधीही ऐकायला मिळत नाही. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी, गतिमान करण्यासाठी राज्यसरकार काय उपाययोजना करणार याबाबत त्यांनी कधी पत्रकार परिषदेमध्ये बोलल्याचे आठवत नाही. नवाब मलिक इतर राज्यांनी केलेल्या चांगल्या कामांची उदाहरणे देत असताना इतर राज्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी आपण राज्यात काय केले हे ते कधीच सांगत नाहीत'', असेही दरेकर म्हणाले.

परदेशाला मदत पाठविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रावर अनेक पक्षांनी टीका केली होती. परंतु आज फ्रांस, कतार येथून ऑक्सिजन साठा, व्हेंटीलेटर तसेच आरोग्य यंत्रणा सामुग्री येत असून अनेक देश मदतीचा हात पुढे करत आहे. 'गिव्ह अँड टेक' पॉलिसी प्रमाणे आपण अन्य देशांना मदत केली, नसती तर आज संकट काळात परदेशातून आपल्याला मदत मिळाली नसती, याचे भानही मलिक यांनी ठेवावे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com