हसन मुश्रीफ म्हणजे माधुरी दीक्षित किंवा डोनाल्ड ट्रम्प आहेत का..फडणवीसांचा टोला

देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
3hasan_mushriff_devendra_2f.jpg
3hasan_mushriff_devendra_2f.jpg

मुंबई : ''गोयल यांना महाराष्ट्रात पाच लोक तरी ओळखतात का,'' असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. 

''हसन मुश्रीफ म्हणजे माधुरी दीक्षित किंवा डोनाल्ड ट्रम्प आहेत का,' असा सवाल फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना  केला. फडणवीस म्हणाले, 'मुश्रीफ यांनी गोयल यांच्यावर केलेली टीका निषेधार्ह आहे. मुश्रीफ हे कोणी ट्रम्प किंवा माधुरी दीक्षित आहेत का? त्यांनाही कोल्हापूरच्या बाहेर कोणी ओळखत नाही.''

'रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबबत केलेल्या वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे,' असे म्हणत गोयल यांच्या वक्तव्याचा निषेध हसन मश्रीफ यांनी काल कोल्हापूरमध्ये केला.  मुश्रीफ म्हणाले की गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य चुकीचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्र सरकासोबत समन्वय ठेवून आहेत. कोरोनासारख्या महामारीत राजकारण येवू नये, अशी मुख्यमंत्री ठाकरे यांची भूमिका आहे. पियुष गोयल यांची सत्तेची दुसरी फेरी आहे.  हे देशाचे रेल्वेमंत्री आहेत. त्यांच्याकडे वाणिज्य पदाचा भार आहे. हे महाराष्ट्रातील आहेत.  त्यांना ग्रामीण भागात नेऊन हे कोण विचारले तर पाच माणसांनी जरी गोयल यांना ओळखल तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. महाष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आपण राज्याचा अपमान करत आहेत. गोयल हे मुंबईचे आहेत. तरीही ते महाराष्ट्रासोबत कशाला ही संपर्क ठेवत नाही. याउलट ते राज्याचा बदनामी करत आहे 


हेही वाचा : वळसेंच्या कारवाईला मी घाबरत नाही : फडणवीस
 
मुंबई : रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. रेमडिसिवर बाबतचा पोलिस स्टेशनमधील संभाव्य वाद थांबला असून त्यावर आता राजकीय टिप्पण्या सुरू झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर काल टीका केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करून कारवाईचा इशारा वळसे पाटलांनी दिला होता.  याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी  पोलिसांनी बोलवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयात धाव घेऊन संबंधित मालकाला सोडविले. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com