Devendra Fadnavis .jpg
Devendra Fadnavis .jpg

भाजपचे आमदार कमी करण्यासाठी मंत्र्यांनी स्टोरी रचली!

विधानसभेत १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपने (BJP) कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

मुंबई : आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका खरी ठरली. आम्ही सरकारला ओबीसी आरक्षणावरुन उघडे पाडले, या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसे गेले, ते दाखवले. खोटे आरोपे करुन आमच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले. आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारच्या काही मंत्र्यांनी स्टोरी तयार केली, असा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. (Opposition leader Devendra Fadnavis criticizes the state government) 

विधानसभेत १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपने (BJP) कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधताना वरील आरोप केला. ते म्हणाले, अशा घटना घडल्यानंतर नियमित अध्यक्षाच्या चेंबरमध्ये चर्चा होत असते. आजही अध्यक्षांच्या चेंबरमध्ये भाजपच्या एकाही सदस्याने तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केली नाही.

शिव्या देणारे दुसरेच होते. आमदार आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांना सांगितले की, सगळ्या सदस्यांच्या वतीने मी माफी मागतो. त्यानंतर भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) यांची आमदार गिरीश महाजन आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गळाभेटही घेतली. तो विषय तेथेच संपवून आम्ही बाहेर आलो. त्यानंतर आमचे आमदार निलंबीत करण्यासाठी या सरकारच्या मंत्र्यांनी स्टोरी तयार केली, असा आरोप फडणवीस यांनी केला.  

आमच्या 12 काय सगळ्या सदरस्यांचे पद रद्द करा, असेही फडणवीस म्हणाले. या आधीही आमदार अनेकदा स्टेजवर चढले, पण कधी कोणावर निलंबनाची कारवाई झाली नाही. माझ्यावर हक्कभंग आणला तरी काही हरकत नाही. पण खरे सांगतो आमच्या आमदारांनी तिथे शिवीगाळ केली नाही, शिवसेनेच्या सदस्यांनी तिथे येऊन धक्काबुक्की केली. आमचे सदस्य तिथे आक्रमक झाले होते, पण त्यांना आम्ही शांत केले, असा दावाही फडणवीस यांनी केला.

मराठा समाजाला सरकारने फसवले आहे. मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा ठराव आणला गेला, असा आरोप फडणवीस यांनी केला. ठरावाच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे आरक्षण परत आणायचे नाही. असे सरकारने ठरवले आहे. केवळ वेळकाढूपणा केला जात आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com