विधान परिषदेवर नेमावयाची ती बारा नावे फक्त या दोन नेत्यांनाच माहिती. - Only these two leaders know the twelve names to be appointed to the Legislative Council | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेवर नेमावयाची ती बारा नावे फक्त या दोन नेत्यांनाच माहिती.

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

बारा नावांचा सस्पेन्स कायम

मुंबई : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमावयाच्या जागांसाठीचे गुपित अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या नावांचा लिफाफा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार आहेत.

यात कोणाची नावे आहेत, याचे उत्तर अनेक जण शोधत आहेत. अनेकजण आपापल्या परीने अंदाज बांधत आहेत. मात्र ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांनाच माहिती असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेले उत्तरच खरे ठरते आहे.

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी प्रत्येकी चार नावे दिली आहेत. त्यात उर्मिला मातोंडकर यांच्यापासून ते शरद पोंक्षे अशी अनेक नाव चर्चेत आली. काॅंग्रेसच्या नावांची यादी दिल्लीहून थेट मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या पक्षातील नावेही कोणाला माहिती नाहीत. यामुळे सध्या विविध नावांचा केवळ अंदाज व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांची नावे दिल्याची चर्चा आहे. याशिवाय सेनेकडून उर्मिला मातोंडकर, शरद पोंक्षे, सचिन अहिर, राहुल कलान, वरुण सरदेसाई, राजेश क्षीरसागर अशा नावांचा अंदाज आहे. काॅंंग्रेसकडून नसीम खान, सत्यजित तांबे यांच्याही नावाची शक्यता आहे. पण पूर्ण आणि खात्रीलायक नावे कोणाकडेच नाहीत.अ

अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख