दिलासादायक : मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार  - The number of corona patients is declining in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

दिलासादायक : मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३५१ नवीन रुग्ण सापडले असून, रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसते.

मुंबई : रुग्णसंख्या (corona patients) कमी झाल्याने दुपटीचा कालावधी वाढून १०६३ दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दरही ०.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन ६,१६१ हजारांवर आला आहे. (The number of corona patients is declining in Mumbai) 

हेही वाचा : गणेश नाईकांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३५१ नवीन रुग्ण सापडले असून, रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७ लाख ३१ हजार ९१४ झाली आहे. ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ७ लाख ०७ हजार ६५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ७८ लाख ११ हजार ७४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत मंगळवारी दिवसभरात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा १५ हजार ७२६ झाला आहे. मृत झालेल्यांपैकी नऊ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. 

 
दरम्यान, मंगळवारी (ता. २० जुलै) दिवसभरात राज्यात ७ हजार ५१० रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर ६ हजार ९१० नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय, १४७ कोरोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : फडणवीसांची कबुली; निवडणूक निकालानंतर अधिकारी इस्त्राईलला गेले पण...

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६. ३३ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार ७५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ३५४ व्यक्ती होमक्वारंटाईन आहे. तर ३ हजार ९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहे. तर, राज्यात संध्या एकूण ९४ हजार ५९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख