जळगावातील वसतिगृहात नेमकं काय घडलं; गृहमंत्र्यांनी दिली ही माहिती...

जळगाव येथील शासकीय महिला वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावल्याचा आरोप केला जात आहे.
Nothing wrong with a womens hostel in Jalgaon says anil deshmukh
Nothing wrong with a womens hostel in Jalgaon says anil deshmukh

मुंबई : जळगाव येथील शासकीय महिला वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांसह काही बाहेरील व्यक्तींनी मुलींना नृत्य करण्यास भाग पाडले, असा दावा काही सामाजिक संघटनांनी केला आहे. पण या आरोपात तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. 

शासकीय महिला वसतिगृहातील प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी काल विधानसभेत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार व इतर नेत्यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर देशमुख यांनी समितीन नेमून चौकशीचे आदेश दिले. या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला आहे.

देशमुख यांनी आज विधानसभेत याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, याप्रकरणी समितीने 41 जणांची साक्ष घेतली आहे. वसतिगृहामध्ये 17 महिला राहत होत्या. घटनेची तक्रार केलेली महिला मानसिक रुग्ण आहे. तिच्या पतीने यापूर्वीच ही तक्रार केली आहे. वसतिगृहामध्ये पोलिस जाऊच शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी असा कोणताही व्हिडिओ बनवलेला नाही. वसतीगृहात महिलांच्या नृत्य आणि गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एका महिलेने घातलेला झगा त्रास होत असल्याने काढला होता, असे चौकशीत समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधकांना आरोप करण्याआधी शहानिशा करण्याची विनंती केली. ते म्हणाले, आमची एखादी भगिनी उठते आणि एखादा आरोप करते. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे काय सुरू आहे, असे लोकांना वाटेल. महिलांच्या बाबतीत आम्ही असे प्रकार खपवून घेणार नाही. पण विरोधांनी बातम्यांची पूर्ण शहानिशा करून वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी, असे पवार म्हणाले. 

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीचे समर्थन केले. तसेच कोणत्याही माहितीची शहानिशा न करता आरोप करणे चुकीचे आहे. वसतिगृहातील महिलांची बदनामी झाली आहे. ज्यांनी ही बदनामी केली त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या घटनेत तथ्य नसल्याचे सांगितले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com