त्या कंत्राटदाराला धमकावले नाही, त्यांनीच टक्केवारीची भाषा केली :यशवंत जाधव 

जर माझ्या विभागात काम होत असेल तर ते चांगले व्हावे यासाठीच मी आग्रही असेल
त्या कंत्राटदाराला धमकावले नाही, त्यांनीच टक्केवारीची भाषा केली :यशवंत जाधव 

मुंबई : व्हिडीओ क्‍लिपमधील आवाज माझाच आहे. मात्र, मी कंत्राटदाराला धमकावले नाही. उलट, कंत्राटदारानंच माझ्यासोबत टक्केवारीची भाषा केली... 

सदर , कंत्राटदारानं या आधी टी वॉर्ड मध्ये एकच आणि ते ही निकृष्ट दर्जाचे काम केले होते असा खुलासा शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. 

जर माझ्या विभागात काम होत असेल तर ते चांगले व्हावे यासाठीच मी आग्रही असेल. त्यामुळे, सदर कंत्राटदार कशा पद्धतीने काम करणार याची मी चौकशी करणारच. 
माझ्याकडेही समोरील लोकांच्या क्‍लिप आहेत. त्या मी बाहेर काढीन असे सांगतानाच या कंत्राटदाराच्या मागे कोण आहे हे उघड करेन असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

हा शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न असे स्पष्ट करून जाधव म्हणाले, की अशा प्रकारे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचं काम करुन निघुन जातात याला कारण ई टेंडरींगची पद्धत आहे. सदर कंत्राटदाराच्या आधीच्या कामाची चौकशी व्हावी तसेच,या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे असे पत्र मी प्रशासनाला दिले आहे. 

दरम्यान, मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी निवीदा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार मे. यश कॉर्पोरेशनच्या रमेश सोलंकींनी केली आहे. जाधव यांच्याविरोधात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिसांना तक्रारीचे पत्र दिले आहे. 

मर्जीतला कंत्राटदार नेमण्यासाठी यशवंत जाधवांकडून धमकी येत असल्याचा आरोप सोलंकी यांनी केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक, पालिका अधिकारी आणि मर्जीतील कंत्राटदार संघटीत गुंडगिरी करत असल्याचं या पत्रात म्हटले आहे. 

ई वॉर्डातील 209 बीट मधील ई निवीदाअंतर्गत सर्वात लघुत्तम निविदाकार असूनही आपल्याला काम दिलं जात नसल्याची तक्रार सोलंकी यांनी केली आहे. 

यामध्ये, यशवंत जाधव, सौ. मनस्वी तावडे, राकेश सागठिया हे त्रिकुट मर्जीतील कंत्राटदार आणण्यास आग्रही आहे असे पत्रात म्हणटले आहे...सोबतच रमेश सोंलकींनी माझ्यासह माझ्या भागीदारांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास या तिघांना जबाबदार धरण्यात यावे असे सोलंकी यांनी या पत्रात म्हटले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com