मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त येणाऱ्या शुभेच्छा कोविड योद्ध्यांना समर्पित  

आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी.
not celebrate my birthday chief minister udhhav thackrey appeals
not celebrate my birthday chief minister udhhav thackrey appeals

मुंबई  : 'आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. 

आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले. २७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री म्हणतात. 

गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान, प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे.

जनतेने सावध राहण्याचे  गृहमंत्र्यांचे आवाहन     

मुंबई : कोरोना  रुग्णांच्या उपचारासाठी  उपयोगी  ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या उपचारावरून जनतेची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकाराबाबत जनतेनी सावध राहावे, असे आवाहन  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातील रक्तद्रव (प्लाझ्मा) काढून रुग्णाला दिला जातो. यामुळे कोरोना रुग्णाची प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने या उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी काही रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक व प्लाझ्मा डोनेशन मोहिम सुरू केली आहे. या सुविधेचा काहीजण गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहे.

सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर विविध पातळीवर काम करीत आहे. त्यामुळे संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. प्लाझ्मा डोनर (दाता) ऑनलाईन शोधतानाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात दाखवून फसवणूक होऊ शकते. त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईलच. या संदर्भात कोणालाही तक्रार करावयाची असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर नोंदवावी, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे. 

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com