आपल्या लोकांना देशाबाहेर काढण्याची कोणात हिम्मत नाही, नितीशकुमारांचा इशारा  - No one has the courage to take their people out of the country, warns Nitish Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

आपल्या लोकांना देशाबाहेर काढण्याची कोणात हिम्मत नाही, नितीशकुमारांचा इशारा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नितीशकुमार यांच्या निशाण्यावर एनआरसी कायद्या होता आणि हा कायदा केंद्रातील मोदी सरकारने आणला आहे.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. योगी आपल्या भाषणात जी भाषा वापरतात ती नितीशकुमारांना रूचत नाही.

योगींचा मुस्लिम विरोध त्यांना मान्य नाही. हे दोन्ही नेते एनडीएत असले तरी मुस्लिमांची मते आपल्यापासून दूर जावू नयेत याची काळजी नितीशकुमार घेत आहेत. 

योगींनी केलेल्या भाषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कोणामध्येही हिम्मत नाही, की आपल्या लोकांना देशाबाहेर काढण्याची. एनआरसीचा मुद्दा उपस्थित करीत देशात घुसखोरी करणाऱ्या मुस्लिमांना देशाबाहेर काढण्याचे विधान योगी यांनी एका सभेत केले होते. ज्या दिवशी योगींनी हे विधान केले त्यानंतर काही वेळातच नितीशकुमार यांनी एनआरसीच्या मुद्यावरून देशातील मुस्लिमांची बाजू घेतली. योगींवर टीका करताना मात्र त्यांनी त्यांचे नाव घेतले नाही. 

त्यांची एक व्हिडिओ क्‍लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये नितीशकुमार म्हणतात, की हे कोण आहेत फालतू गोष्टी करणारे. कोण कोणाला देशाबाहेर काढणार आहे. देशात कोणाचीही हिम्मत नाही, की आपल्या लोकांना बाहेर काढण्याची.जे या देशात राहतात ते सर्व हिंदुस्थानी आहेत. भारतीय आहेत. कोण कोणाला बाहेर काढणार साहेब? आपल्या सरकारने बिहारमधील अल्पसंख्यांकासाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याची माहितीही ते देण्यास विसरले नाहीत. 

नितीशकुमार यांच्या निशाण्यावर एनआरसी कायद्या होता आणि हा कायदा केंद्रातील मोदी सरकारने आणला आहे. याला नितीशकुमार यांचा विरोध आहे. सर्वाना बरोबर घेऊन चालणे हाच आमचा धर्म आहे आणि हीच आपली संस्कृती आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील जनतेने मला संधी दिल्यानंतर प्रत्येक घटकासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात बंधुभाव कसा वाढेल यासाठीही मुख्यमंत्री म्हणून मी प्रयत्न केले आहेत. मात्र काही लोकांना समाजात तेड निर्माण करायचे आहे. आपआपसात भांडणे लावायची आहेत. जर बंधुभावाचे वातावरण असेल तर राज्याची प्रगती होईल असेही नितीशकुमार यांनी सांगितले. 

योगी हे बिहारमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बिहारमध्ये आले होते. ते आपल्या भाषणात एका विशिष्ठ्य समाजाला लक्ष्य करीत असतात. योगींचे भाषण नितीशकुमार यांना मात्र रूचत नसल्याचे दिसून येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख