मुलाखती देऊन कोणी बाळासाहेब होत नाही...

स्वातंत्र्यालढ्यात पं. बंगाल, पंजाब, व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे.
 Atul Bhatkhalkar, Uddhav Thackeray .jpg
Atul Bhatkhalkar, Uddhav Thackeray .jpg

मुंबई :  पश्चिम बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष  जे. पी. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे.

टागोरांप्रमाणे दाढी वाढवून पंतप्रधान मोदीही रविवारी (ता. २४ जानेवारी) रोजी कोलकत्यात येऊन गेले, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. त्यावर सामना पुन्हा चिरपला आहे, असा सणसणीत टोला भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

अतुल भातखळकर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, सामना पुन्हा चिरपला आहे. म्हणे दाढी वाढवून रवींद्रनाथ होता येत नाही. अहो मोदींना हे माहिती आहे, परंतु मॅरेथॉन मुलाखती देऊन बाळासाहेब होता येत नाही, हे बहुधा कार्यकारी आणि घरबशा मुख्यमंत्र्यांना ठाऊक नसावे...असी टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. 

अग्रलेखात काय म्हटले आहे. 

स्वातंत्र्यालढ्यात पं. बंगाल, पंजाब, व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पंजाबच्या शेतकर्यांना दिल्लीच्या सीमेवर ठेचले जात आहे. पं. बंगालात धुमशान सुरु आहे.

महाराष्ट्रावर ठरवून हल्ले केले जात आहेत. जे महाराष्ट्रात घडले, तेच पं. बंगालात घडताना दिसत आहे. स्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फोज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. बिहारलाही तेच झाले. आता पं. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे. चालू द्या!

पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे. पण, रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदुत्वाच्या मुद्यांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादाची ठिणगी पडली नसती. 

 प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतःहा गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष  जे. पी. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकत्यात येऊन गेले, निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ट्रम्प छाप नाही. असे अग्रलेखात म्हटले आहे. 

कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच पं. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरु केली आहे. असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com