कितीही मिठाचा खडा टाका, कांजूमार्गलाच कारशेड होणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार - No matter how much salt you throw, there will be a car shed on Kanju Marg, the Chief Minister has decided | Politics Marathi News - Sarkarnama

कितीही मिठाचा खडा टाका, कांजूमार्गलाच कारशेड होणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा उल्लेख करीत भाजपला नाव घेता टोले लगावले.

मुंबई : मेट्रोचे कारशेह कांजूरमार्गलाच होणार असे स्पष्ट करताना या प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे. 

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना संकट, लॉकडाऊन, पुन्हा कोरोना येण्याची भिती, महाराष्ट्र द्वेशाचं राजकारण, मेट्रो कारशेडचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख करतानाच दिवाळी उत्सहात पण, फटाके मर्यादीत प्रमाणात वाजवून साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा उल्लेख करीत भाजपला नाव घेता टोले लगावले. ते म्हणाले, की मेट्रोची आरो कारशेडची जागा कांजूमार्गला हलविण्याबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे. कोणत्याही परिस्थितीत कांजुरमार्गलाच मेट्रोचे कारशेड होणार आहे. विरोधक यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आपण कोणच्याही टीकेची पर्वा करणार नाही. सरकार आपले काम करीत राहिल. 

कारशेडसाठी जर्मन कंपनीकडून कर्ज घेतले आहे असे सांगून ठाकरे म्हणाले, की जर्मनीच्या त्या कंपणीला महाराष्ट्र गुंतवणूकीसाठी सोयीस्कर वाटतो असे एका अधिकाऱ्याने आपणास सांगितले. लॉकडाऊननंतर आता एक एक गोष्टी सुरू आहेत. लवकर शाळा सुरू होणार आहे.

मंदिरेही सुरू होती. या सर्व गोष्टी सुरू करताना सरकार जशी काळजी घेत आहे तशी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने कोरोनाच्या काळात काळजी घेतल्याने आपण संकटाशी सामना करू शकलो. पुन्हा कोरोनाचे संकट येणार नाही यासाठीही जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

हे ही वाचा : 
भारताच्या प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारणार ! 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहाणी केली. जोगेश्वरी येथील मातोश्री क्‍लबच्या मैदानात या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलीय. 

कुलाबा गेट वे आँफ इंडिया जवळील रिगल सिनेमा सर्कलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा बसवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. शिल्पकार शशिकांत वडके यांनी गेल्या वर्षभरापासूून या पुतळा निर्मीतीचं काम केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या पुतळ्याची पहाणी केली. त्यावेळी शिल्पकार शशिकांत वडके यांना त्यांनी काही तांत्रिक सुचनाही केल्या आहेत. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख