मी नाराज नाही..आरक्षण मिळाले पाहिजे..नितीन राऊतांचा विश्वास..

कुणी तरी कोर्टात धाव घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. त्याला २१ तारखेला सुनावणी आहे.
1Nitin_20Raut_2002_4.jpg
1Nitin_20Raut_2002_4.jpg

मुंबई : मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचे बोलले जात आहे. आज मागासवर्गीय आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. यात विविध विषयावर चर्चा झाली. Nitin Raut reaction regarding reservation in backward class promotion

पदोन्नतील आरक्षण कायम राहिले पाहिजे, या मुद्यावर कॅाग्रेस ठाम असून याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे कॅाग्रेसने स्पष्ट केलं आहे. पदोन्नतील आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू, असे कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे, तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आज सकाळी पदोन्नतीतील आरक्षण यांच्यासोबत विशेष बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.  

या बैठकीबाबत नितीन राऊत म्हणाले की, बैठक सकारात्मक झाली. सरकारही सकारात्मक आहे. आता काही अडचण येणार नाही. सरकारतर्फे अजित दादांनी भूमिका मांडली. त्यावर अभ्यास केला जाईल. तीन पक्षाचं सरकार आहे. अनेक विषयावर निर्णय घेताना समजावून सांगितले जातात. सर्व बाबी समजून घेतलेल्या आहे. 

नितीन राऊत म्हणाले, "याबाबतचा निर्णय बाकी असून कुणी तरी कोर्टात धाव घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. त्याला २१ तारखेला सुनावणी आहे. लवकरच तोडगा काढला जाईल. मी नाराज नाही. माझा प्रश्न मागास वर्गीयांना आरक्षण मिळायला हवे. निर्णय सकारात्मक येईल."

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरही पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरुच आहे. निवडणुकीपूर्वी तुणमूल कॅाग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा तुणमूलमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले दीपेंदू बिश्वास हे स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिलं आहे.  भावनेच्या भरात आपण भाजपमध्ये जाण्याच्या चुकीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ममता दीदींना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी बशीरहाट दक्षिण परिसरातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वी सोनाली गुहा, दीपेंदू बिस्वास, रविंद्रनाथ भट्टाचार्य, जटू लाहिडी, शीतल सरकार, सरला मुर्मू आदींनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण निवडणुकीनंतर सोनाली गुहा आणि सरला मुर्मू आणि दीपेंदू बिश्वास यांचा भाजपमध्ये जाऊन अपेक्षाभंग झाला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com