आंबिल ओढ्यावरील कारवाई योग्य होती का? राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

लोकप्रतिनिधींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, याबद्दल नितीन राऊत यांनीनापसंती व्यक्त केली होती.
Sarkarnama Banner - 2021-07-07T115915.591.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-07T115915.591.jpg

मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा, दांडेकर पुल येथे मागासवर्गीयांची मोठया प्रमाणात झोपडपट्टी वसाहत आहे. ओढयाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली या रहिवाशांची घरे पाडण्याच्या पुणे मनपाच्या बेकायदेशीर कृतीची स्वतंत्र चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. Nitin Raut letter to Chief Minister Uddhav Thackeray Ambil Odha

डॉ. राऊत यांनी या वस्तीस भेट देऊन रहिवाशांची भेट घेतली होती.  मनपा आयुक्तांची भेट घेत कारवाईतील त्रुटींवर बोट ठेवून त्यांना जाबही विचारला होता. आंबिल ओढा वस्तीतील  घरे पुणे मनपाने तोडल्याचे कळताच व्यथित झालेल्या डॉ. राऊत यांनी २९ जून रोजी रहिवाशांची भेट घेतली होती. पुणे मनपाच्या या कृतीबद्दल डॉ. राऊत यांनी पुणे भेटीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

ही कारवाई करणाऱ्यांना लाज वाटायला हवी अशी टीकाही त्यांनी केली होती. ही कारवाई होताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. या वस्तीतील महिलांशी गैरवर्तन करण्यात आल्याची गंभीर तक्रारही त्यांनी या पत्राद्वारे केली असून दोषींवर उचित कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. या वस्तीतील विस्थापित झालेल्या दलित मागासवर्गीय रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

"नागपुरात अशी बेकायदेशीर कृती झाली असती तर मी स्वतः बुलडोझरसमोर झोपलो असतो," अशा शब्दांत त्यांनी पुणे महापालिका व सत्ताधाऱ्यांना सुनावले होते. "याप्रकरणी पुणे मनपाने बेकायदेशीर कारवाई केली का? या कारवाईमागे कुणाला बेकायदेशीर लाभ पुरवण्याचा हेतू होता का? पुणे मनपाची या कारवाईसाठी संमती योग्य होती का? याची चौकशी राज्य सरकारकडून होणे आवश्यक आहे. याशिवाय या वस्तीत राबविण्यात येणाऱ्या एस.आर.ए. प्रकल्पाची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. रहिवाशांची खोटी नावे टाकून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे दाखवून या एस.आर.ए. योजनेला बिल्डरने संमती मिळविल्याची तक्रार येथील रहिवाशांनी माझ्याशी बोलताना केली. या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई केली जाणे गरजेचे आहे,"अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ४ जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

"सुमारे ७० वर्षांपासून येथे हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहूजन गृहरचना संस्था येथील रहिवाशांनी स्थापन केली आहे. " मनपा प्रशासनाने घरे खाली करताना वस्तीतील आबालवृद्ध, महिला व मुलींना मारहाण केली. काही घरे, सामूहिक शौचालये बेकायदेशीरपणे तोडली. यामुळे अनेक जण बेघर झाले," याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे. 

 योग्य मोबदला द्यावा !
"या झोपडीधारकांना  मनपाने घराऐवजी घर, दुकानाऐवजी दुकान दयावे.  भरपाई म्हणून एकाच घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त कुटुंबे वास्तव्यास असल्यास प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर देण्यात यावे", अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com