सरदेसाई यांच्या सुरक्षा व्यवस्थेची नितेश राणे यांनी उडवली खिल्ली - Nitesh Rane scoffed at Sardesai's security arrangements | Politics Marathi News - Sarkarnama

सरदेसाई यांच्या सुरक्षा व्यवस्थेची नितेश राणे यांनी उडवली खिल्ली

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

राज्य शासनाने काल एकूण १३ जणांना नव्याव वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचीव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

मुंबई : युवा सेनानेते वरुण सरदेसाई यांना राज्य सरकारने पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेची खिल्ली भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उडवली आहे. त्यांनी टि्वटर वरुन सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. 

राज्य शासनाने काल एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावरु नितेश राणे यांनी मंत्रालयातल्या हस्तक्षेपामुळे तिथले अधिकारी सरदेसाईंवर चिडले, असल्याने त्यांना सुरक्षेची नक्कीच गरज आहे, असा चिमटा राणे यांनी काढला आहे. 

राणे आपल्या टि्विटमध्ये म्हणाले की, सरदेसाई यांच्या मुलाला सुरक्षा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अशी योग्य चाल खेळली, त्यांना अतिरिक्तत सुरक्षेची गरज आहे, मंत्रालयातल्या हस्तक्षेपामुळे तिथले अधिकारी सरदेसाईंवर चिडले, असल्याने त्यांना सुरक्षेची नक्कीच गरज आहे, असा चिमटा राणे यांनी काढला आहे. 

 

रविवारी राज्य सरकाने राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात फडणवीस, पाटील, दरेकर, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, नारायण राणे, आशिष शेलार या भाजप नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. तर अनेक नेत्यांनी नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. त्यामुळे राणे यांनी सरदेसाई यांना लक्ष केले. 

यांना मिळाली नवीन वर्गवारी सुरक्षा 

रामराजे निंबाळकर- वाय प्लस एस्कॅार्टसह
विजय वडेट्टीवार - वाय प्लस एस्कॅार्टसह (मुंबई शहरात)
वैभव नाईक - एक्स
संदीपान भुमारे - वाय
अब्दुल सत्तार- वाय 
दिलीप वळसे पाटील- वाय 
सुनील केदार - वाय 
प्रवीण दरेकर - वाय 
प्रकास शेंडगे - वाय 
नरहरी झिरवाळ - वाय 
सुनेत्रा पवार - एक्स 
वरुण सरदेसाई - एक्स 
राजेश क्षीरसागर - एक्स 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख