''शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब'' राणेंचा राऊतांवर 'प्रहार'

ही पेंग्विनची सेना...बाळासाहेबांची सेना आहे कूठे ?
Sarkarnama Banner - 2021-08-02T110235.519.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-02T110235.519.jpg

मुंबई : शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज 'सामना'च्या अग्रलेखातून आज भाजपच्या नेत्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अग्रलेखातून भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्याला भाजपचे नेते नितेश पाणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ''शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी,'' असं म्हणत राणेंनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांच्यावर अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.  

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या 'सामना'तून भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.  ''भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांड्यांसारखे आपापल्या खुराड्याच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित!, असी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून आज करण्यात आली आहे. 

सोळा कोटींच्या इंजेक्शनानंतरही अकरा महिन्याच्या वेदिकाची मृत्यूशी झूंज अपयशी  
आपल्या टि्वटमध्ये नितेश राणे म्हणतात, ''नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय ?? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला .. मराठीचे खरे मारेकरी … ही पेंग्विनची सेना … मा.बाळासाहेब यांची सेना आहे कूठे ? मराठी माणसाची संघटना म्हणे..मग.. BEST च्या जागा - कनाकीय, Bmc कॉन्ट्रॅक्ट - दिनो, रात्रीच्या पार्ट्या - पटानी ..कपुर .. Jaqueline.. इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ?''

भाजपतील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! 
तर दुसऱ्या टि्वटमध्ये राणे म्हणतात, " शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहिती साठी.. सचिन आहीर - bks ची जबाबदारी, राहुल कनाल - शिर्डी संस्था, आदेश बांदेकर - सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत - कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार - मंत्री, प्रियांका चतुर्वेदी - खासदार, यादी मोठी आहे..''

आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही ; दरेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. ''कोणत्याही पक्षाच बालेकिला कायम नसतो. निवडणुका येतील म्हणून आम्ही बूथ बांधणी सुरु केलेली नाही. आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही,'' अशी निशाणा दरेकर यांनी नाव ने घेता शिवसेनेवर केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com