मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही  - Nitesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

नीलेश राणे यांनी तीन ट्विट करून वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केला आहे.

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करत मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. 

नीलेश राणे यांनी तीन ट्विट करून वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की ''वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलिस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे'', असे राणे म्हणाले आहेत.

गिरीश महाजन म्हणतात सत्ता तर आमचीच येणार 

दुसर्या ट्वीटमध्ये राणे म्हणाले की  ''२५ फेब्रवारी- अंबानींच्या घरा बाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली. ५ मार्चला- मनसूक हिरेनची बॉडी सापडली. ६ मार्चला- तपास ATS कडे. पण २ मार्चलाच वाझेच्या घरा कडचे CCTV गायब. हेच सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियानच्या केस मध्ये घडले पण तिथे आरोपी मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून आजपर्यंत वाचला''. असा हल्लाबोल नीलेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. 

''शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते, असे सचिन वाझेंनी म्हटल्याचा मीडिया रिपोर्ट आहे. याचा अर्थ शिवसेना या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे याबाबतचे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही राणे यांनी केली.

नारायण राणेंचीही राष्ट्रपती राजवटीची मागणी

नारायण राणे यांनी रविवारी (ता. १४ मार्च) पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. त्यामुळे मी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलिसांचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी केला जात आहे, अशी टीकाही राणे यांनी केली होती.

बिजल्ली मल्ला, माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन
 

सचिन वाझे यांना झालेल्या अटकेविषयी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेचे अनेक नेते वाझेंच्या संपर्कात होते. वाझेंच्या जीवावर शिवसेनेच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. सचिव वाझेंवर शिवसेनेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे वाझेंनी आतापर्यंत हाताळलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. दिशा सालियन, सुशांतसिंह रजपुत यांच्या मृत्यूही चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी राणे यांनी यावेळी केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख