शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ - Nitesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल बुधवारी (ता. ३ मार्च ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल बुधवारी (ता. ३ मार्च ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, भाजप आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्विटकरत म्हणटले आहे की, ''काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांचे भाषण ऐकल्यानंतर मला असे वाटले की, आता शिवसेनेची अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे,'' असा टोला नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. 

तामिळनाडूत राजकीय भूकंप : शशिकलांची राजकारणासह सार्वजनिक जीवनातून तडकाफडकी निवृत्ती

 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपहासाने नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरुन आता जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नटसम्राटला कालच नीतेश राणे यांनी कॅामेडी सम्राट असे प्रत्युत्तर दिले. 

नीतेश राणे यांनी काल ट्विट करत म्हणाले होते की,  आज एक 'कॉमेडी सम्राट' विधानसभेत पाहिला आणि ऐकला.. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! "कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री" अशी टीका केली होती. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री? 

आर्थिक पाहणी अहवालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधासनभेत विरोधकांवर चांगलेच भडकले होते. अहवाल तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोरोनावर अहवाल तयार केला आहे. ही थट्टा असल्याचे सांगत मुख्यमंत्री यांनी बिहारशी तुलना करून काढण्यात आलेल्या निष्कर्षाच्या आधारे विरोधकांकडून महाराष्ट्राला बदनाम केले जात असल्याची टीका केली होती. 

बीड जिल्हा बॅंकेचा वाद राज्यपालांच्या दारात 
 

कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत दिली होती. त्यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. बिहारचा कोविडमधला फोलपणा समोर आला आहे. तिथे होणाऱ्या चाचण्या तसेच इतर बाबींचे सत्य समोर आले आहे. हे निकष धरून महाराष्ट्राला बदनाम करत आहात. महाराष्ट्रातील यंत्रणेवर विश्वास न ठेवता महाराष्ट्राला बदनाम करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले होते. 

दाराआडही कधी खोटे बोलणार नाही

कोरोना काळात आम्ही एकही रुग्ण किंवा मृत्यू लपवला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. आम्ही कधीही खोटी माहिती दिली नाही. खोटेपणा करणे आमच्या रक्तात नाही. बंद दाराआडही कधी बोलणार नाही. पाठ थोपटून घ्यायला, काम करणारी छाती असावी लागते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.

पीएम केअर फंडची पोलखोल करा

महाराष्ट्रातील जनतेसाठी सोयीसुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरू केले होते. विरोधकांचा फंड महाराष्ट्राकडे न येता दिल्लीकडे गेला, असे मुख्यमंत्री म्हणतातच भाजपच्या काही आमदारांनी आक्षेप घेतला. आम्ही निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फंडची पोलखोल करताना पंतप्रधान फंडचा हिशेब कोण देणार. पण ते महनीय व्यक्ती आहेत. त्यांचा फंड विचारण्याची कोणामध्ये हिंमत नाही. प्रश्न विचारला की देशद्रोह. ही इथली लोकशाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख