देशमुख आणि अजित पवारांना जो नियम लागला तोच अनिल परबांनाही लागतो - Nitesh Rane criticizes Anil Parab  | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुख आणि अजित पवारांना जो नियम लागला तोच अनिल परबांनाही लागतो

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवे.

सिंधुदुर्ग : एनआयएच्या NIA कोठडीत असलेला निलंबित सहायक पोलिस निरिक्षक सचिन वाझेने Sachin Waze शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांनीही १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केल्यानंतर आता विरोधक चवताळून सरकारवर टीका करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली आहे.

राणे म्हणाले, ''विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विचारले होते की गृहखाते अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, यावर काल शिक्कामोर्तब झाले आहे. वकील असलेल्या माणसाने अशा प्रकारच्या शपथा खायच्या असतात का''? असा सवाल त्यांनी केला.

राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या-शरद पवारांचे जनतेला आवाहन

''तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवे. जो नियम माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना लागतो, जो नियम सिंचन घोटाळ्याच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लागला, जो नियम आदर्श घोटाळ्याच्यावेळी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना लागला. तोच नियम अनिल परबांना लागतो. तेव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नाहीत ते चौकशीला सामोरे गेले'. 

लहान शेम्बड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नयेत. सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यामधले संवाद हे एनआयकडे आहेत, टेलिग्रामचे चॅट पण त्यांच्याकडे आहेत. उद्या तोंड काळ होण्यापेक्षा आजच राजीनामा दया आणि चौकशीला सामोरे जा'', असे नीतेश राणे म्हणाले आहेत. 

सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा खोटा...महाराष्ट्रच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतही लस टंचाई
 

दरम्यान, अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा Pradip Sharma पण शिवसेनेचे Shivsena उमेदवार होते मान्य करतो.

पण वाझेंना शिवसेनेने अस काम करायला सांगितले नाही. केंद्रीय यंत्रणाच वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख