033Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1_1_0.jpg
033Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1_1_0.jpg

  मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानामागे वेगळाचा डाव ; राणेंचा आरोप

शिवसेनेचे नेते आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबई : "व्यासपीठावर उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,'' असा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपच्या एका मंत्र्याला ऑफर दिली होती. याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे. शिवसेनेचे नेते आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला पुन्हा साद घातल्याचे दिसून आले.  उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांनी काल एका भाषणाची सुरुवातच भाजपला एका मंत्र्याला ऑफर देत केली मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी” भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी 'एकत्रित आले तर भावी सहकारी' असा उल्लेख केला. 

जयंत पाटील-फडणवीस एकाच गाडीत : चर्चेला उधाण
नितेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, मुंबईतील बीकेसी परिसरातील उड्डान पुलाता गर्डर कोसळून दुर्घटना घडली होती या घटनेत अनेक मजूर जखमी झाले. या घटनेवरुन माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे का, यामागे वेगळाच डाव आहे. 

हेही वाचा : शहा यांच्याच काळात युतीचा तुकडा पडला ; ते कोणताही चमत्कार घडवू शकतात..
मुंबई : गुजरातमधील राजकीय बदल आणि 2024 च्या निवडणुकांवर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. 'भाजपच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी( Narendra Modi)यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतलं जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही', असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com