मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू?

भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू?
Sarkarnama Banner - 2021-07-24T142918.013.jpg

मुंबई : अतिवृष्टीमुळे rainआलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे आणि या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. nitesh rane allegation cm uddhav thackeray black magic

मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू चालत असल्याचं आम्ही ऐकतोय, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. आपल्या टि्वट मध्ये नितेश राणे म्हणतात की, स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळी जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल.

कोकणासह मुंबई, मध्यमहाराष्ट्राला दोन दिवसापासून झोडपले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास दैाऱ्या केलेला नाही. यावरुन भाजपचे नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित पंढरपुरला गेले होते. पण अपघातग्रस्तांकडे मुख्यमंत्र्यांना यायला वेळ नाही, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टिका होत आहे. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. 

चित्रा वाघ आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का..खरी गरज आता आहे 
तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय.. 

राणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी 
मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका यंत्रणेला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आगामी निवडणुकीसाठी तयारी लागले आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in