देशातील उपलब्ध वस्तू अधिक महाग होणार.. - Nirmala Sitharaman Mumbai's entrepreneurs make it easy to budget  | Politics Marathi News - Sarkarnama

देशातील उपलब्ध वस्तू अधिक महाग होणार..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

देशात उपलब्ध आहे, ते अधिक महाग करीत आहोत. सप्टेंबरमध्ये याबाबत निर्णय होईल," असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सांगितलं. 

मुंबई : "करदात्यांवर सरकारचा विश्वास आहे, त्यादृष्टीने पावलं उचलली आहेत. निर्यात वाढवण्यासाठी जागतिक पातळीवर सहभागी होणे गरजेचं आहे. जे साहित्य भारतात मिळत नाही ते आयात करावंच लागेल, मात्र जे देशात उपलब्ध आहे, ते अधिक महाग करीत आहोत. सप्टेंबरमध्ये याबाबत निर्णय होईल," असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सांगितलं.  

निर्मला सीतारामण म्हणाल्या की कोरोना काळात महिला, दिव्यांग यांना अधिक सुविधा देऊ शकलो असतो, पण काही मर्यादा होत्या. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे. प्रथम जीव वाचविणे, त्यानंतर उद्योगविश्व वाचवण्याचं आव्हान होतं.आम्ही अधिकाधिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कोरोना काळात खूप काम केलं, जनतेनं एकत्र येऊन मदतीचा हात दिला. विकसित देश संघर्ष करीत आहेत. भारत कोणत्याही परिस्थितीत संकटाशी सामना करण्यास तयार असतो. आपली संपूर्ण स्वदेशी कोरोना लस 100 देशात पोहचली आहे. 

निर्मला सीतारमण म्हणाल्या की मुंबईचे उद्योजक, कार्यकर्ते यांनी पंतप्रधान आणि अर्थ मंत्रालयाला सतत माहिती पाठविली त्यामुळे बजेट बनवणं सोपं गेलं. पंतप्रधानांनी सांगितलं होतं की जनतेवर एका पैशाचाही बोजा टाकू नका. खाजगी क्षेत्रात स्पष्टता आणली आहे.

करदात्यांचं जीवन अधिक चांगलं व्हायला पाहिजे. देशाला आश्वासन देऊ इच्छिते की कर योग्य ठिकाणी आणि विकासासाठी खर्च होईल. टॅक्स भरण्याबाबत मुंबई खूप अलर्ट आहे. कर दात्यांवर सरकारचा विश्वास आहे, त्यादृष्टीने पावलं उचलली आहेत. निर्यात वाढवण्यासाठी जागतिक पातळीवर सहभागी होणे गरजेचे आहे. जे साहित्य भारतात मिळत नाही ते आयात करावंच लागेल, मात्र जे भारतात उपलब्ध आहे, ते अधिक महाग करीत आहोत. सप्टेंबरमध्ये याबाबत निर्णय होईल.

तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून काही जण जीएसटी (GST) टाळत आहेत, यामुळे देशाचं नुकसान होत आहे, त्यांना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. प्रामाणिक करदात्याला दर्जेदार परतावा मिळावा, कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा सरकारचा हेतू आहे. विचार बदलणारं हे बजेट आहे, पंतप्रधानांवर विश्वास ठेवा, हे बजेट दिशा बदलणारं, मानसिकता बदलणारं आहे. सगळ्यांसाठी विचार करून तयार केलेलं हे बजेट आहे.  
- निर्मला सीतारामण  
    

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख